नाशिक : डॉक्टरांना घेऊन मंत्री गिरीश महाजन केरळमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार
केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आज केरळात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील 110 डॉक्टरांची टीम देखील जाणार आहे. राज्यातील औषध कंपन्यांनी देखील हवी तेवढी औषधे उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली आहे. तर रेमंड कंपनीने पूरग्रस्तांना पाच ट्रक ब्लँकेट देण्याचे आश्वासन दिले आहे.