712 | राज्यात चार लाख हेक्टर ऊसक्षेत्रावर क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2018 10:09 AM (IST)
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता हुमणी किडीचं संकट उभं राहीलंय. राज्यात जवळपास ४ लाख हेक्टर ऊसक्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव बघायला मिळालाय. ऊसामध्ये ४० ते ७० टक्क्यांपर्यंत हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती आहे. आधीच पावसाच्या खंडाने ऊस उत्पादनात घट येण्याची शक्यता होती. त्यात हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्यानं ऊसाच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा १४ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आलीये. त्यापैकी ४ लाख हेक्टर क्षेत्रावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालाये.