विरार | सोनसाखळी चोराची घटना सीसीटीव्हीत कैद
वसई-विरार पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईल चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय. आगाशी नाक्यावरुन जाताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची घटना समोर आलीय. सोनसाखळी चोरट्यांचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. काल संध्याकाळी कविता पंडित ही महिला रस्त्यावरून पायी जात असताना विरुद्ध दिशेने मोटर सायकल वरून २ तरूण आले. आणि काही कळायच्या आत त्यांनी कविता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेवून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र हे चोरटे काही हाती लागले नाही.