712 | देशातील कापूस उत्पादनात 4.7 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2018 08:34 AM (IST)
देशातील कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता कॉटन असोसियेशन ऑफ इंडीयानं वर्तवली आहे. यंदा कापूस उत्पादनात ४.७ टक्क्यांची घट बघायला मिळण्याची शक्यता आहे. यामागे पावसाचे मोठे खंड आणि गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचं कारण असल्याचं सांगीतलं जातंय. यंदा ३ कोटी ४८ लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. उत्पादनात घट झाल्यानं कापसाच्या निर्यातीमध्येही घट होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील स्थिती पाहता यंदा कापसाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असण्याची शक्यता आहे.