बहिणाबाईंच्या कवितांनी सजलं डोंबिवलीतलं उद्यान
सांस्कृतिक नागरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत एक आगळं-वेगळं उद्यान उभं राहिलं आहे. या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे यात बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची भिंत उभारण्यात आली आहे.
डोंबिवलीच्या सुनीलनगर परिसरात हे उद्यान उभारण्यात आलं असून त्याला नावही कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यान असंच देण्यात आलं आहे. या उद्यानात पूर्वी फक्त खेळणी होती, मात्र उद्यानाचं नूतनीकरण करताना बहिणाबाई चौधरींच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.