बांग्लादेशसोबत भारताचा कापसासाठी ड्युटी फ्री करार | 712 | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2018 08:42 AM (IST)
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी फायद्याची जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, याचं कारण म्हणजे जागतिक बाजारात कापसाला मागणी वाढतेय. यातच भर म्हणजे बांग्लादेश मध्ये भारतीय कापसाची आयात आता ड्यूटी फ्री म्हणजे करमुक्त करण्यात आलीय. या मुक्त वापरामुळे भारतीय कापसाला बांगलादेश मध्ये उठाव मिळाणार आहे. बांगलादेश हा आशिया खंडात मोठा सूत उत्पादक देश म्हणून पुढे आलाय. यातच मागणी उत्पादनात मोठी तफावत आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. भारतातून बांगलादेशला जवळपास 40-42 लाख गाठी कापसाची निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.