712 | ग्लायफोसेट तणनाशकावरील बंदी काढली
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2018 08:36 AM (IST)
अमेरीकेत ग्लायफोसेट या तणनाशकामुळे कॅन्सर झाल्यानं कंपनीला ड्वान जॉन्सन या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी लागली होती. त्यानंतर देशातही ग्लायफोसेटवर बंदी घालण्यात आली. यावर कृषी विभागानं महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. ग्लायफोसेटवरील बंदी हटवण्यात आलीये. ग्लायफोसेटवरील बंदीच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आलीये. या निर्णयामुळे मोन्सॅन्टो सोबतच ४० कंपन्याना दिलासा मिळालाय. राज्यात सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेटचा वापर होतो. मान्यता नसलेल्या पिकांवर ग्लायफोसेटचा वापर होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. देशभरात मोठ्या प्रमाणात या तणनाशकाचा वापर होत असल्यानं, संपूर्ण अभ्यास करुन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलंय.