Charger Safety Tips : आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक टेक्नॉसेव्ही गोष्टींचा वापर करतो. यामध्ये मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop), कॉम्प्युटर, पॉवर बॅंक यासारखे अनेक गॅजेट्स येतात. मात्र, या सगळ्यात कॉमन वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे चार्जर (Charger). रोजच्या वापरात वापरला जाणारा मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण जे चार्जर वापरतो आपल्याला असं वाटतं हे चार्जर फार सुरक्षित (Safe) असते. पण, तुम्हाला माहीतही नसेल की यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. अशा अनेक केसेस घडल्या देखील आहेत. या ठिकाणी आपण मोबाईल चार्जर वापरताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 


मोबाईल चार्जर वापरताना 'अशी' काळजी घ्या 


बटण स्विच ऑफ करा


अनेकदा आपण मोबाईल चार्ज करताना चार्जरचं स्विच बटण ऑफ (Switch Off) करायला विसरतो. नंतर करू असं म्हणून आपण अगदी सहजपणे ती गोष्ट टाळतो. पण तुम्हाला माहीत आहे की, हीच गोष्ट तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. यामुळे शॉर्ट सर्किट होऊन स्फोटदेखील होऊ शकतो. त्यामुळे नेहमी मोबाईल चार्ज झाल्यानंतर चार्जिंगचं बटण बंद करायला अजिबात विसरू नका. 


चार्जर योग्य ठिकाणी ठेवा, गुंता करू नका 


तसेच, मोबाईल चार्जर आपण ज्याप्रकारे वापरतो ती पद्धत बदलणं गरजेचं आहे. अनेकदा घाईगडबडीत आपण चार्जर तसेच आपल्या बॅगेट भरतो. अशा परिस्थितीत चार्जर लवकर खराब होऊ शकते. अनेकदा चार्जरची पिन सैल होते. वायर तुटली जाते. अशा वेळी अनेकदा आपण टेप लावतो आणि त्या समस्येकडे दुर्लक्ष करतो. मात्र, असे न करता वेळीच ही सवय बदला. चार्जरचा गुंता अजिबात करू नका. 


स्वस्तात अॅडाप्टर विकत घेऊ नका 


अनेक मोबाईलमध्ये विकत घेताना त्याबरोबर अॅडाप्टर (Adapter) मिळत नाही. अशा वेळी आपण थर्ड पार्टी अॅडाप्टर विकत घेतो. पण, थर्ड पार्टी अॅडाप्टर विकत घेताना इनडोअर, डबल इन्सुलेशन आणि क्वालिटी टेस्ट या तीन गोष्टी असणारेच अॅडाप्टर विकत घ्या. आणि स्वस्तातला अॅडाप्टर कधीही विकत घेऊ नका. यामुळे तुमचे पैसे तर वाचतील पण या चार्जरमुळे स्फोट होण्याचा देखील धोका असतो. 


महत्त्वाच्या बातम्या :


Samsung Galaxy : दमदार बॅटरी आणि जबरदस्त लूकसह Samsung Galaxy A15 चं नवं व्हेरिएंट भारतात लॉन्च; वाचा A to Z माहिती