Social Media : भारतासह जगभरातील लोक (social Media) अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, स्नॅपचॅट अशा अनेक सोशल मीडिया अॅप्स आणि प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला जातो. सध्या सगळीकडेच सोशल मीडिया वापणाऱ्यांची संख्या भरपूर आहेत. सगळ्याच वयोगटातील लोक सध्या अॅक्टिव्हली सोशल मीडिया वापरतात. मात्र अमेरिकेत राहणारे लोक सगळ्यात जास्त कोणतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात, हे तुम्हाला माहितीये का? अमेरिकेतील फेसबुक, इन्स्टाग्राम वापरत नाही तर ते नेमकं कोणतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात? जाणून घेऊया...


अमेरिकेत सर्वाधिक वापरले जाणारे अॅप


'Per Research Center 'ने केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अमेरिकेत म्हणजेच अमेरिकेत राहणारे बहुतांश लोक युट्युबचा सर्वाधिक वापर करतात. या सर्वेक्षणातील अहवालानुसार, अमेरिकेतील 83% प्रौढ युट्यूब वापरतात, जे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.


अमेरिकेतील 68 टक्के लोक वापरत असलेल्या युट्यूबनंतर फेसबुक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्राम तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा वापर अमेरिकेत राहणारे 47 टक्के लोक करतात. अमेरिकेत राहणारे 35 टक्के लोक पिंटरेस्ट वापरण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. यामध्ये पाचव्या क्रमांकावर चीनचे अॅप टिकटॉक आहे, जे अमेरिकेत राहणारे 33 टक्के लोक वापरतात.लिंक्डइन या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे, ज्याचा वापर अमेरिकेत राहणारे 30 टक्के लोक करतात. व्हॉट्सअॅप सातव्या क्रमांकावर आहे, ज्याचा वापर अमेरिकेत राहणारे 29 टक्के लोक करतात. स्नॅपचॅट आठव्या क्रमांकावर आहे, ज्याचा वापर अमेरिकेत राहणारे 27 टक्के लोक करतात. यात नवव्या क्रमांकावर एक्स (ट्विटर) आहे, जो अमेरिकेत राहणारे 22 टक्के लोक वापरतात. या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर रेडिट आहे, जो अमेरिकेत राहणारे 22 टक्के लोक वापरतात.


हे 7 सोशल मीडिया अॅप्स जगभरात लोकप्रिय आहेत


Meta च्या अॅप्सवर जगभरातील लोक सर्वाधिक सक्रिय आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. यानंतर WeChat, TikTok आणि चीनचे Douyin प्रसिद्ध आहेत. मग ट्विटर, मेसेंजर आणि टेलिग्राम हे जगभर प्रसिद्ध आहेत. भारतातील मेटाच्या तिन्ही अॅप्सवर बहुतांश लोक सक्रिय आहेत. अलीकडेच कंपनीने थ्रेड्स अॅप देखील लॉन्च केले आहे. ज्याने 150 दशलक्ष युजरबेस ओलांडला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Samsung Galaxy S24 : Samsung Galaxy S24 सीरिजचा सेल सुरू, हजारो रुपयांची होणार बचत, Bank Offers कोणते आहेत?