Samsung Galaxy S24 : SamsungGalaxy S24 सीरिजच्या विक्रीला दमदार सुरुवात झाली आहे. हा स्मार्टफोन सीरिज गॅलेक्सी एस 24 आता भारतात आता खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Smartphone) 'मेड इन इंडिया' Samsung Galaxy S24 सीरिजमध्ये लाइव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रेटर, चॅट असिस्ट, नोट असिस्ट आणि ट्रान्सक्रिप्ट असिस्ट फीचर्स (AI) देण्यात आले आहेत. सॅमसंग कीबोर्डमध्ये बिल्ट-एआय हिंदीसह 13 भाषांमध्ये रिअल टाइममध्ये टेक्स्ट भाषांतर देखील करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हायोलेट आणि टायटॅनियम ब्लॅक रंगात 1,29,999 रुपयांपासून (12 जीबी + 256 जीबी व्हेरियंट) सुरू होतो. 12 जीबी प्लस 512 जीबी व्हेरियंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. तर गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा (सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा) च्या 12 जीबी प्लस 1 टीबी मॉडेलची किंमत 1,59,999 रुपये आहे.
गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस 24 प्लस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 12,000 रुपयांचा फायदा मिळेल, तर गॅलेक्सी एस 24 खरेदी करणाऱ्यांना 10,000 रुपयांचा फायदा मिळेल. गॅलेक्सी एस 24 सीरिजची निर्मिती भारतात सॅमसंगच्या नोएडा फॅक्टरीमध्ये केली जात आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एस 24 सीरिजसाठी प्री-बुकिंग अनेकांनी केली आहे, ज्यामुळे ही भारतातील आतापर्यंतची सर्वात यशस्वी S सीरिज बनली आहे. HDFC bank 6000 कॅशबॅक मिळत आहे. samsung Upgrade मध्ये 6000 कॅशबॅक मिळणार आहे. त्योसबतच तुमच्या क्रेडिट कार्डनुसार वेगवेगळे ऑफर्सदेखील मिळू शकतात.
Samsung Galaxy S24 Ultra : अल्ट्रा मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर कंपनी क्वाड कॅमेरा सेटअप देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. अल्ट्रामध्ये तुम्हाला अॅल्युमिनियमऐवजी टायटॅनियम बॉडी मिळेल. याशिवाय यात 6.8 इंचाचा एमोलेड 2Xक्यूएचडी प्लस डिस्प्ले आणि 5000 एमएएच बॅटरी मिळू शकते.
Samsung Galaxy S24 Plus : प्लस आणि बेस मॉडेलमध्ये तुम्हाला समान कॅमेरा सेटअप मिळेल. प्लसमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा एमोलेड 2X क्यूएचडी प्लस डिस्प्ले, 12 जीबी रॅम, 4900 एमएएच बॅटरी आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल.
Samsung Galaxy S24 : फोटोग्राफीसाठी तुम्हाला 8के व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. यात 6.7 इंचाचा अमोलेड २एक्स एफएचडी डिस्प्ले, 4000 एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह 128 जीबी आणि 265 जीबी स्टोरेज पर्याय मिळू शकतात. डिझाइनच्या बाबतीत Samsung Galaxy S24चे बेस आणि प्लस मॉडेल मागील वेळेसारखेच असतील, तर एस 24 अल्ट्रामध्ये यावेळी कर्व्हऐवजी फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो.
इतर महत्वाची बातमी-
- Aadhaar Card : आधार कार्डचा फोटो बदलायचाय? कसा बदलणार? किती पैसे लागतील? सगळी माहिती एका क्लिकवर...
- OnePlus Nord N30 SE : वनप्लसने लाँच केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; मिळणार 5000 एमएएच बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा