Shopping Apps in India : भारतात अनेक शॉपिंग अॅप्स वापरल्या (Flipkart) जातात. गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अनेक ई-कॉमर्स कंपन्याही बाजारात आल्या आहेत. युजर्सला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनी नवनवीन प्रकारचे फिचर्स जोडत असते. यावेळी फ्लिपकार्टनेही अशाच एका नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमुळे आता फ्लिपकार्ट अॅप जास्त प्रमाणात वापरलं जाण्याची शक्यता आहे.


अॅमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टने सुरू केली सेम-डे डिलिव्हरी


फ्लिपकार्टने भारतातील 20 शहरांमध्ये सेम-डे डिलिव्हरी सेवेची घोषणा केली आहे. म्हणजेच भारतातील 20 शहरांमध्ये फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी केलेली कोणतीही वस्तू त्याच दिवशी युजर्सच्या दारात पोहोचवली जाईल. ई-कॉमर्स अ ॅपच्या उशीरा डिलिव्हरीमुळे अनेक युजर्स त्रस्त होतात आणि अनेकवेळा ऑर्डर करूनही प्रॉडक्ट परत करतात, कारण तीच डिलिव्हरी बराच वेळ होऊनही होत नसल्याने ही सेवा युजर्ससाठी सोपी होणार आहे. 


अॅमेझॉन आपल्या प्राइम यूजर्स ना नेक्स्ट-डे डिलिव्हरी आणि बऱ्यात प्रोडक्टवर सामान्य यूजर्सना सेम-डे डिलिव्हरी  ऑफर करते. अॅमेझॉन वगळता मिंत्रा आणि फ्लिपकार्ट सारख्या इतर शॉपिंग अ ॅप्समधून खरेदी करताना कधी कधी वस्तू यूजर्सने ऑर्डर केलेल्या दिवशीच त्याच्या घरी पोहोचतात पण याची शाश्वती नसते. आता फ्लिपकार्टने अधिकृतपणे सेम-डे डिलिव्हरी सुरु केली आहे.


या शहरात दिली जाणार सेम-डे डिलिव्हरी


अहमदाबाद,बंगळुरू,भुवनेश्वर,कोईम्बतूर,चेन्नई,दिल्ली,गुवाहाटी,हैदराबाद,इंदौर,जयपूर,कोलकाता,लखनौ,लुधियाना,मुंबई,नागपूर,पुणे,पटना,रायपूर,सिलिगुडी,विजयवाडा,अहमदाबाद 



या 20 शहरांपैकी कोणत्याही शहरात राहणाऱ्या युजर्सने फ्लिपकार्टच्या शॉपिंग अॅपवरून दुपारी 1वाजेपर्यंत प्रॉडक्ट ऑर्डर केल्यास ते प्रॉडक्ट त्याच दिवशी रात्री 12 वाजेपूर्वी त्यांच्या घरी पोहोचेल. येत्या काळात बाकी शहरात सेम-डे डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे फ्लिपकार्टने म्हटलं आहे.


फ्लिपकार्टने 2014 मध्ये 10 शहरांमध्ये या सर्व्हिसची टेस्टही केली होती, पण काही महिन्यांनंतर कंपनीने आपली सेवा बंद केली होती. फ्लिपकार्टची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने 2017 पासून भारतातील अनेक शहरांमध्ये सेम-डे डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. ही सेवा चांगली यशस्वी झाली आहे. 


फ्लिपकार्टची मालकी पूर्णपणे विकली


एका छोट्याशा खोलीतून सुरुवात करून फ्लिपकार्टला मोठ्या उंचीवर नेणारे बन्सल ब्रदर्स म्हणजेच, फ्लिपकार्टची (Flipkart) ओळख. पण आता हीच ओळख पुसली गेली आहे. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल  यांची फ्लिपकार्टशी जोडली गेलेली नावं आता पूर्णपणे मिटली आहेत. म्हणजेच, आता बन्सल ब्रदर्सकडे फ्लिपकार्टचे काहीच हक्क राहिलेले नसून त्यांनी आपल्याकडील फ्लिपकार्टची मालकी पूर्णपणे विकली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Flipkart Co-Founder: फ्लिपकार्टमधून 'बंसल' युगाचा अस्त; बिन्नी बंसल यांचा राजीनामा, पुढे काय करणार ई-कॉमर्स कंपनीचे फाउंडर?