Whatsapp New Feature : सोशल मीडियावरील (Social Media) लोकप्रिय अॅप व्हॉट्सअप (Whatsapp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काहीना काही नवीन अपडेट घेऊन येत असतं. यावेळी देखील व्हॉट्सअपकडून अशाच एका नवीन फीचर अपडेटची घोषणा फेसबुक मेटाचे सहसंपादक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्याकडून करण्यात आली आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्सना आता थेट तारखेवरूनच मेसेज, फोटो, व्हिडीओ शोधता येणार आहे. नेमकं हे फीचर कसं काम करणार? या फीचरचे फायदे काय आहेत? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.    


खरंतर, अनेकदा आपल्याला व्हॉट्सअपवर एखादा मेसेज, फोटो, पोस्ट किंवा व्हिडीओ सर्च करायचा असल्यास बराच वेळ Scroll करावं लागायचं. यामध्ये एकतर बराच वेळ जायचा शिवाय अनेकदा तो मेसेज स्टोरेज फुल झाल्यामुळे डिलीटही व्हायचा. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, यूजर्सची हीच समस्या ओळखून व्हॉट्सअपने सर्च बाय डेट (Search By Date) नावाचं नवीन फीचर सादर केलं आहे. हे फीचर यापूर्वी आयओएएस, मॅक डेक्सटॉप आणि व्हॉट्सअप वेब या ठिकाणी लागू होतं. आता याचा लाभ Android यूजर्सना देखील घेता येणार आहे.  


हे फीचर कसं वापराल? 


हे फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रूप चॅटवर जा. 
आता सर्च ऑप्शनवर गेल्यावर या ठिकाणी तुम्हाला Calendar असा icon दिसेल. 
या ठिकाणी Calendar icon सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या तारखेचा अहवाल,माहिती, फोटो, व्हिडीओ हवा आहे ती तारीख टाका. तुम्हाला ती मिळून जाईल 


ग्रूपमधला ठराविक फोटो निवडायचा असल्यास...


कोणत्याही चॅटवर क्लिक करा. 
टॅटच्या शीर्षस्थानी मोबाईल नंबर किंवा ग्रूपचं नाव क्लिक करा. 
त्यानंतर Media Links and DOC'S


या ठिकाणी सर्वात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, व्हॉट्सअपकडून सर्च बाय डेट हे फीचर संदेश सुविधा सुरळीत चालावी यासाठी अॅक्टिव्ह करण्यात आलं आहे. तसेच, या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला ज्या तारखेचा मेसेज, व्हिडीओ, फोटो पाहायचा असेल तीच तारीख एन्टर करायची आहे. व्हॉट्सअपच्या या नव्या फीचरमुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. तसेच, या फीचरमुळे यूजर्सचा संदेश, मेसेज, फोटो आणि व्हिडीओ शोधण्याचा वेळदेखील वाचणार आहे यात शंका नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Smartphone Hack : 'ही' आहेत स्मार्टफोन हॅक होण्याची लक्षणं; 'या' सोप्या टिप्स ठरतील तुमच्यासाठी उपयोगी