Whatsapp : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन अपडेट आणत असते. WhatsApp चे जाळे हे जगभरात सर्वत्र पसरले आहे.  इन्स्टंट मेसेजिंग अॅपला आणखी सोपे आणि आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने एक नवीन फीचर आणले आहे. इन्स्टंट व्हिडीओ मेसेजेस असे या फीचरचे नाव आहे. या फीचरच्या माध्यमातून आता तुम्ही तुमचा मेसेज व्हिडीओमध्येही पाठवू शकता. आतापर्यंत तुमच्याकडे टेक्स्ट किंवा ऑडिओ रेकॉर्डद्वारे संदेश पाठवण्याचा पर्याय होता, परंतु आता तुम्हाला  व्हिडीओच्या माध्यमातून मेसेजचा पर्याय देखील मिळत आहे. याच्या मदतीने व्हॉट्सअॅपवर यूजर्सना मेसेज पाठवणे पूर्वीपेक्षा अधिक मजेदार आणि सोपे होऊ शकते. 


व्हॉट्सअॅपने त्यांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ही माहिती दिली आहे. आता वापरकर्ते त्यांच्या चॅटवरच लहान आणि वैयक्तिक संदेश व्हिडीओद्वारे रेकॉर्ड करून तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. चॅटवर उत्तर देण्याचा हा एक प्रकारचा रिअल टाइम मार्ग असेल. वापरकर्त्यांना 60 सेकंदांचा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळेल आणि या 60 सेकंदात तुम्ही तुम्हाला हवे ते सांगून संदेश पाठवू शकता. 






या फिचरचा वापर करण्याकरता या स्टेप्स फाॅलो करा


- हे व्हॉइस मेसेज सारखेच वापरण्यास सोपे आहे.
- व्हिडिओ मोडवर टॅप करा.
- व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी धरून ठेवा.
- लॉक करण्यासाठी वर स्वाइप करा आणि व्हिडिओ पाठवा.
- चॅटवर व्हिडिओ म्यूट केला जाईल, टॅप केल्यावर आवाज येईल.


लवकरच हे फिचर सर्वांकरता उपलब्ध करून देण्यात येईल


मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या चॅनलवर या फिचरबद्दल पोस्ट केले आहे. त्यांनी लिहिले की, व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर रिलीज होत आहे. यासाठी झटपट व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवता येईल. हे फीचर व्हॉइस मेसेज प्रमाणे पाठवण्याइतके सोपे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हे फीचर फक्त काही लोकांसाठी रिलीज करण्यात आले आहे आणि लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. 


याआधी देखील असेच  एक भन्नाट फिचर Whatsapp यूजर्सकरता घेऊन आले होते. ते म्हणजे Voice Notes ज्याचा वापर लोक आवडीने करत आहेत. हे फिचर वापरण्याकरता अतिशय सोपे आणि मजेशीर आहे. हा कंटेंट इतर स्टेटस सारखाच 24 तास अॅक्टिव्ह राहतो. त्यानंतर तो आपोआप डिलीट होतो. 2017 मध्ये WhatsApp ने पहिल्यांदा स्टेटस शेअर हा प्रकार केला होता.