WhatsApp Investigation: मेटाच्या (Meta) मालकीची मेसेजिंग सेवा व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) गोपनीयतेचे (Privacy Policy) उल्लंघन केल्याच्या आरोपांची सरकार चौकशी करेल, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी दिली आहे. हा तपास ट्विटरचे अभियांत्रिकी संचालक (Engineering Director) फोड डबिरी (Foad Dabiri) यांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. फोड डबिरी (Foad Dabiri) झोपलेले असताना व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचा मायक्रोफोन अ‍ॅक्सेस केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


फोड डबिरी (Foad Dabiri) यांच्या म्हणण्यानुसार, ते झोपलेले असताना आणि सकाळी 6 वाजता उठल्यानंतर देखील व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या मोबाईलचा मायक्रोफोन वापरत (Microphone Access) होता.






अगदी ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क (Twitter CEO Elon Musk) यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. फोड डबिरी (Foad Dabiri) यांची पोस्ट शेअर करत व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) विश्वास ठेवता येणार नाही, असे ते म्हणाले.






व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) मंगळवारी अभियंत्याच्या तक्रारीला प्रतिसाद दिला, व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरचे अभियांत्रिकी संचालक (Engineering Director) फोड डबिरी (Foad Dabiri) यांनी केलेल्या ट्विटवर उत्तर दिले आहे. या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप गेल्या 24 तासांपासून पिक्सेल फोन आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या त्यांच्या तक्रारीबद्दल त्यांच्याशी संपर्कात असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) सांगितले. तर, वापरकर्त्यांचे त्यांच्या फोनमधील माईकच्या सेटिंग्जवर संपूर्ण नियंत्रण असते, यावर कंपनीने भर दिला आहे.






व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) त्यांचे मायक्रोफोन वापराचे धोरण (Microphone Usage Policy) स्पष्ट केले आहे. वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) माईकचा अ‍ॅक्सेस घेऊ शकत नाही, परवानगी मिळाल्यावरच वापरकर्ता कॉल (Call) करत असताना, व्हॉइस नोट (Voice Note) किंवा व्हिडिओ (Video) रेकॉर्ड करत असतानाच व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मायक्रोफोनचा वापर करते. बाकीवेळा माईकचा वापर करुन वापरकर्त्यांचे संभाषण ऐकण्याचे काम व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) करत नाही. शिवाय, हे संभाषण एंड-टू-एंड एनक्रिप्शनद्वारे (end-to-end encryption) संरक्षित केले जातात, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे संभाषण ऐकू शकत नाही याची ती खात्री असते, असे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कंपनीने दिले आहे.


व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) विरोधात ही तक्रार नेमकी अशा वेळी आली आहे, जेव्हा मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आधीच सरकारकडून चौकशीच्या फेऱ्यात आहे. त्यामुळे, व्हॉट्सअ‍ॅप या प्रकरणाचा सामना कसा करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा: