Difference Between Mixer Grinder And Blende : मिक्सर ग्राइंडर प्रत्येक स्वयंपाक घरातील अगदी महत्वाची आणि कामाची गोष्ट. हे आपल्याला आपल्या आवडत्या डिशसाठी योग्य मसाले तयार करण्यात मदत करते (Difference Between Mixer Grinder And Blende) आणि आपलं सोपे करते. म्हणूनच याला किचन किंग असेही म्हणतात. स्वयंपाकासाठी योग्य मसाले बनवण्यासाठी मिक्सरची मदत हवी असेल तर तुमच्यासाठी योग्य मिक्सर खरेदी करणं गरजेचं आहे. सध्या नवनव्या फिचर्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हीही स्वतःसाठी मिक्सर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे कोणत्याही किचन मिक्सरसाठी आवश्यक असतात, पण सर्वप्रथम मिक्सर ग्राइंडर कसे काम करते हे समजून घ्या...


मिक्सर ग्राइंडर कसे काम करते?


मिक्सर ग्राइंडर जारमध्ये काही साहित्य टाकून चालू केल्यावर त्याच्या आत असलेल्या ब्लेडमुळे आणि फोर्समुळे त्यात टाकलेले साहित्य प्रेशरने गोल फिरते आणि त्यात टाकलेले पदार्थ बारीक करते. उदा. कांदा, टोमॅटो टाकले तर त्याची ग्रेव्ही हवी असेल तर ग्रेव्ही तयार होते किंवा बारीक हवा असेल तर बारीक चिरुनदेखील मिळतं. त्यामुळे स्वयंपाक सोपा होतो. 



मिक्सर ग्राइंडर आणि ब्लेंडर मधील फरक


बरेच लोक चुकून मिक्सर ग्राइंडरला ब्लेंडर म्हणतात, जे चुकीचे आहे. मिक्सर ग्राइंडर हे एक मशीन आहे जे आपण बारीक करण्यासाठी, कापण्यासाठी, किसण्यासाठी आणि कोरडे करण्यासाठी वापरू शकता, तर ब्लेंडरचा वापर फक्त स्ट्रॉबेरीसारख्या मऊ भाज्या आणि फळांचा रस काढण्यासाठी केला जाऊ शकतो. 


मिक्सर किती वॅटचा असतो?


मिक्सर ग्राइंडर 3 वेगवेगळ्या आउटपुटमध्ये उपलब्ध आहेत. यात 500 W आणि 750 W आणि 1000 W मिक्सरचा समावेश आहे. 500W चं मिस्कर चांगलं असतं. ते कमी वीज वापरते आणि 4 जणांच्या लहान कुटुंबांसाठी योग्य आहे.तर 750 वॉटचा मिक्सर ग्राइंडर हाय परफॉर्मन्स देतो. हे थोडे जास्त वीज वापरतो आणि 4 ते 5 सदस्यांच्या  कुटुंबासाठी उपयुक्त आहे, तर 1000 वॉट मिक्सर ग्राइंडर खूप चांगल्या पद्धतीने काम करते. हे खूप वीज वापरते आणि रेस्टॉरंट चालविणाऱ्यांसाठी कामाचं आहे. सध्या सगळ्यांकडेच वेगवेगळी फिचर्स असलले मिक्सर, ग्रॅंडर वापरत असतो. त्यान नवनव्या डिझाईन्सदेखील उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्यासाठी योग्य मिक्सर निवडा.


इतर महत्वाची बातमी-


Health Tips : काय सांगता! सिगारेटचं व्यसन नसणाऱ्यांनाही कॅन्सरचा धोका; फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत डॉक्टर काय सांगतात?