What is GB WhatsApp : जीबी व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅपचे क्लोन अॅप आहे, जे मूळ अॅप कॉपी करून तयार करण्यात आले आहे. यात असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत जे मूळ व्हॉट्सअॅपवर उपलब्ध नाहीत. या प्रकारच्या क्लोन केलेल्या अॅप प्रकाराला मोडेड अॅप्स देखील म्हणतात. हे क्लोन अॅप अधिकृत नाही, त्यामुळे ते Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते थेट Google वर शोधून किंवा कोणत्याही थर्ड पार्टी अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या बातमीत आम्ही GB WhatsApp बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. 


What is GB WhatsApp : जीबी व्हॉट्सअॅपमध्ये मिळतात हे फीचर्स


मेसेज शेड्यूल करा: जीबी व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) युजर्सला मेसेज  शेड्यूल करण्यासाठी एक पर्याय मिळतो, ज्यामुळे ते त्यांना हवे तेव्हा मेसेज शेड्यूल करू शकतात आणि त्यांना हव्या असलेल्या वेळी मेसेज पाठवू शकतात.


DND ची सुविधा: जर तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेजपासून काही काळ आराम हवा असेल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चालू ठेवायची असेल, तर तुम्ही GB WhatsApp चे डू-नॉट-डिस्टर्ब फीचर्स वापरू शकता.


डिलीट केलेले मेसेज वाचा: तुम्ही WhatsApp वरील प्रत्येकासाठी डिलीट केलेले मेसेज वाचू शकत नाही, पण GB WhatsApp तुम्ही ते वाचू शकता.


स्टेटस डाउनलोड: जीबी व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp) युजर्सना स्टेटस डाउनलोड करण्याचा पर्याय मिळतो.


फोटो गॅलरीमधून मीडिया फाइल्स लपवा: यूजर्स व्हॉट्सअॅपवरील (WhatsApp) फोटो गॅलरीमधून मीडिया फाइल्स लपवू शकत नाहीत, परंतु हे फीचर जीबी व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध आहे.


What is GB WhatsApp : जीबी व्हॉट्सअॅप किती सुरक्षित आहे?


क्लोन किंवा मॉडेम अॅप्स सहसा सुरक्षित नसतात. व्हॉट्सअॅपवरील (WhatsApp) क्लोन आणि मोडेड अॅप्सवर बंदी घालण्यासाठी व्हॉट्सअॅपचे कठोर धोरण आहे. याशिवाय जीबी व्हॉट्सअॅपचे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नसल्यामुळे ते युजर्सच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी योग्य नाही. मूळ WhatsApp चे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत. एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असल्याने व्हॉट्सअॅप देखील ते मेसेज वाचू शकत नाही. GB WhatsApp अॅप Google Play Store वर देखील सूचीबद्ध नाही, त्यामुळे आमचा सल्ला आहे की हे डाउनलोड करणे टाळा.


इतर महत्वाची बातमी: 


Sanjay Raut : देशात हिंदू नेत्यांचं राज्य असतानाही आक्रोश मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल