Samsung Galaxy S23 Series: मोठ्या प्रतिक्षेनंतर सॅमसंग आपला नवीन जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S23 सीरीज भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळेसही फोन लॉन्च होण्यापूर्वी त्याच्या स्पेसिफिकेशन्सबाबत विविध प्रकारची माहिती लीक झाली आहे. कंपनीने काही काळापूर्वी इव्हेंटची तारीख (Samsung Galaxy Unpacked 2023) अधिकृतपणे जाहीर केली होती आणि आता नवीन जनरेशनच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतींची माहिती इव्हेंटपूर्वी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S23 Galaxy S22 पेक्षा महाग असेल. याचं बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...


Samsung Galaxy S23 अपेक्षित किंमत


एका रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S23 च्या बेस मॉडेलची किंमत 79,999 रुपये असू शकते. जी भारतातील iPhone 14 च्या किमतीपेक्षा जास्त आहे. Galaxy S23 Plus हे मध्यम रेंज मॉडेल असेल, त्याची किंमत 89,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. Galaxy S23 Ultra लाइनअपचा हाय-एंड प्रकार 1,14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच 2022 लाइनअपमध्ये Galaxy S22 ची किंमत 72,999 रुपये, S22 Plus ची किंमत 84,999 रुपये आणि Galaxy S22 Ultra ची किंमत 1,09,999 रुपये होती. त्यानुसार, भारतात सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन लाइनअपच्या किमतींमध्ये 5,000-7,000 रुपयांचा मार्क-अप दिसू शकतो.


OnePlus 11 सीरीज देखील लॉन्च होणार 


OnePlus फेब्रुवारीमध्ये आपली फ्लॅगशिप सीरीज लॉन्च करणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, OnePlus पुढील महिन्यात 7 फेब्रुवारीला आपली फोन सीरीज सादर करणार आहे. या सीरीज अंतर्गत, कंपनी OnePlus 11 5G, OnePlus 11R 5G, कीबोर्ड आणि एक टॅबलेट लॉन्च करू शकते. याशिवाय IQOO NEO 7 5G स्मार्टफोन देखील फेब्रुवारीमध्येच 16 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे. यामध्ये भारतातील पहिला MediaTek Dimension 8200 चिपसेट वापरण्यात आला आहे.


Poco X5 Pro 5G ही होणार लॉन्च 


Poco लवकरच X5 सीरिजचा नवीन फोन Poco X5 Pro 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोबाईल पुढील महिन्यात 6 फेब्रुवारीला बाजारात आणला जाऊ शकतो. या 5G स्मार्टफोनची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच समोर आली आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या 5G फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय मिळतो. Poco X5 Pro 5G ची किंमत एका भारतीय टिपस्टरने उघड केली आहे. Poco चा नवीन फोन 21,000 ते 23,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी Poco X5 Pro 5G स्मार्टफोन तीन मॉडेल्समध्ये सादर करेल, ज्यामध्ये पहिला 6/128GB, दुसरा 8/128GB आणि तिसरा 8/256GB आहे.