Samsung Galaxy Z Flip 3 5G: कोरियन कंपनी सॅमसंगचे फोल्डेबल फोन हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. याच्या दमदार फीचर्समुळे हा फोन अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. हा फोन कॅरी करायला देखील आरामदायी आहे. यातच तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचा फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 3 वर सध्या खूप मोठी सूट दिली जात आहे, ज्या अंतर्गत तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. सॅमसंगने हा मोबाईल फोन जून 2021 मध्ये लॉन्च केला होता. सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन यापूर्वी बिल गेट्सने देखील वापरत होते, आता ते कंपनीचा Samsung Galaxy Z Flip 4 फोन वापरत आहेत.


Samsung Galaxy Z Flip 3 5G: इतक्या हजारांची होणार बचत 


Samsung Galaxy Z Flip 3 5G मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB RAM व्हेरिएंट Flipkart वर 27 टक्क्यांच्या सवलतीनंतर 69,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच बाजारात या स्मार्टफोनची किंमत 95,999 रुपये आहे. याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तुम्हाला या मोबाईल फोनवर 20,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळाला तर तुम्ही हा स्मार्टफोन स्वस्तातखरेदी करू शकता.


Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये तुम्हाला 6.7 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य आणि 12 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 10-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. मोबाईल फोनमध्ये 3300 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइटवरून 11,667 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.


S23 सीरीज लवकरच लॉन्च होणार 


कोरियन कंपनी सॅमसंग फक्त 2 दिवसांनंतर 1 फेब्रुवारी रोजी Samsung Galaxy S23 सीरीजचे अनावरण करेल. ही एक प्रीमियम मोबाईल फोन सीरीज असेल ज्यामध्ये लोकांना जबरदस्त फीचर्स मिळतील. कंपनी या सीरीज अंतर्गत 3 मोबाईल फोन लॉन्च करणार आहे, ज्यांची किंमत एक लाखाच्यावर असू शकते. सॅमसंग S23 सीरीज ही अशी पहिली स्मार्टफोन सीरीज आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण दिले जात आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Sanjay Raut : देशात हिंदू नेत्यांचं राज्य असतानाही आक्रोश मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल