Vivo Y200e 5G Launch : Vivo च्या स्मार्टफोनची (Smartphone) क्रेझ तरूणाईत जास्त पाहायला मिळते. विवो (Vivo) कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या ग्राहकांसाठी Vivo Y200 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या सीरिजमध्ये, कंपनीने आता भारतीय ग्राहकांसाठी Vivo Y200e 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची विक्री देखील सुरु झाली हे. तुम्हाला जर हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही स्मार्टफोनची नेमकी किंमत किती आणि वैशिष्ट्य काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकता. 


Vivo चा हा फोन भारतातील पहिला फोन आहे जो इको फायबर लेदरसह येतो. फोन 120Hz AMOLED डिस्प्ले सह आणला गेला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकरची सुविधा आहे.


Vivo Y200e 5G चे फिचर्स काय असतील? 


प्रोसेसर - Vivo चा नवीन स्मार्टफोन Snapdragon 4nm प्रोसेसर Gen 2 चिपसेट सह आणला गेला आहे.


डिस्प्ले - कंपनीने Y200e 120Hz AMOLED डिस्प्लेसह आणला आहे. हा स्मार्टफोन 6.67 इंचाचा Samsung E4 AMOLED डिस्प्ले, FHD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 394ppi पिक्सेल घनता आणि 1200 nits पीक ब्राइटनेससह येतो.


बॅटरी - Vivo चा नुकताच लाँच केलेला स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 44W फ्लॅश चार्ज फीचरसह येतो.


रॅम आणि स्टोरेज - हा Vivo स्मार्टफोन 6GB/8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह येतो.


कॅमेरा - Vivo Y200e 5G कंपनीने 50MP मुख्य, 2MP bokeh लेन्स आणि 16MP फ्रंट फेसिंग कॅमेरासह आणला आहे.


OS - हा Vivo स्मार्टफोन Android 14 आधारित FunTouch OS 14 सह प्रीलोडेड आहे.


कनेक्टिव्हिटी फिचर्स - हा Vivo स्मार्टफोन ड्युअल सिम, 5G, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, GPS, USB-C पोर्ट वैशिष्ट्यांसह येतो.


कलर ऑप्शन - तुम्ही हा Vivo स्मार्टफोन Saffron Delight आणि Black Diamond कलरमध्ये खरेदी करू शकता.


Vivo च्या नवीन स्मार्टफोनची किंमत किती?


किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo चा नवीन फोन 6GB + 128GB बेस व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर 8GB + 128GB स्टोरेज असलेले टॉप व्हेरिएंट 20,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. स्मार्टफोन सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हा फोन 27 फेब्रुवारीला खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता