Bank Accont : आजच्या बदलत्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) काळात मोबाईलशिवाय (Mobile) कोणतंही काम पूर्ण होत नाही. मोबाईलची आपल्याला इतकी सवय झाली आहे की त्याशिवाय विचार करणं केवळ अशक्य झालं आहे. तसेच, अनेकदा रसत्याच्या कडेला किंवा बाजारात आपण मोबाईल वापरतो तेव्हा पॉकेट मार सहज आपल्या खिशातून मोबाईल काढण्याची देखील अनेक तक्रारी समोर येतात. अशा वेळी एकदा मोबाईल चोरीला गेल्यानंतर आपलं बॅंक अकाऊंट तर रिकामं होणार नाही ना? अशी भिती सर्वांनाच असते.
खरंतर, आजच्या काळात मोबाईलमध्ये UPI, इंटरनेट बँकिंग आणि इतर अनेक आर्थिक सेवा वापरण्याची सुविधा आहे. त्यामुळे आपला मोबाईल चोरीला गेल्यास आपले बँक अकाऊंट रिकामे होण्याची भीती लोकांना वाटते. जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल तर या तीन गोष्टी लगेच केल्याने तुम्हाला कोणतंच टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही.
तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास लगेच 'या' 3 गोष्टी करा
तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा : तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास सर्वात आधी तुमचं सिम कार्ड लगेच ब्लॉक करा. यासाठी तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता किंवा 14422 नंबर डायल करू शकता.
एफआयआर नोंदवा : तसेच, फोन चोरीला गेल्यास जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवा. तक्रार करताना FIR मध्ये फोनचा IMEI नंबर आणि इतर माहिती द्या.
तुमच्या मोबाईलला रिमोटली ब्लॉक करा आणि सर्व डेटा डिलीट करा : जर तुमच्या मोबाईलमध्ये 'Find My Device' किंवा 'Find My Phone' चालू असेल तर याच्या वापराने तुम्ही तुमचा मोबाईल रिमोटली ब्लॉक करू शकता. तसेच, तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करू शकता.
'या' टिप्सही फॉलो करा
- तुमच्या फोनचा IMEI नंबर आणि इतर महत्त्वाची माहिती आधीच लिहून ठेवा.
- तुमच्या फोनवर “Find My Device” किंवा “Find My iPhone” फीचर चालू करा.
- तुमचा फोन पासवर्ड किंवा पिनने सुरक्षित करा.
- सार्वजनिक ठिकाणी तुमचा फोन तुमच्यापासून दूर ठेवू नका.
- या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलची चोरी होण्यापासून वाचवू शकता आणि फोन चोरीला गेल्यास, तुम्ही लगेच तक्रार करू शकता. या टिप्स फॉलो केल्यास तुमचं अकाऊंट रिकामं होण्यापासून वाचेल.