Online Shopping : बदलत्या टेक्नॉलॉजीसह (Technology) आपल्या रोजच्या जगण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत. एकेकाळी घराच्या बाहेर अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू आता मोबाईलमधून (Mobile) ऑनलाईन मागवल्या जात आहेत. खरंतर, ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला वेळ वाचतो त्यामुळे अनेकांची ऑनलाईन शॉपिंगला (Online Shopping) पसंती असते. तसेच, ऑनलाईन शॉपिंगचा फायदा असाही आहे की एकतर वस्तू तुमच्या घरी थेट येते. तसेच, जर तुम्हाला ती वस्तू आवडली नाही तर ती परत देखील करता येते. पण, आता तुमचं टेन्शन वाढणार आहे. आता तुम्ही अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर खराब झालेले किंवा तुटलेले सामान डिलीव्हर केले असले तरीही ते परत करू शकणार नाहीत.


खरंतर, Amazon आणि Flipkart ने त्यांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये डिजिटल रिप्लेसमेंट सेवा बदलली आहे. या बदलामुळे तुमचे काय नुकसान होईल ते येथे जाणून घ्या.


Amazon-Flipkart ने 'ही' सेवा बदलली



  • या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती बदलण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.  

  • यापूर्वी, या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून जेव्हा एखादं प्रोडक्ट ग्राहकांकडे यायचं तेव्हा त्याच्यात काहीही बिघाड असल्यास ते लगेच बदलता येत होतं. दोन्ही प्लॅटफॉर्म बदलीसाठी 7 दिवसांपर्यंतचा कालावधी दिला जात होता.

  • या सुविधेमुळे ग्राहकांना खूप फायदा झाला. जर एखाद्याला डिलिव्हरी केलेल्या वस्तूंमध्ये काही दोष आढळला तर शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तक्रार केली जायची आणि परत करण्याची रिक्वेस्ट केली जायची, पण आता असे होणार नाही.

  • आता जर एखादी सदोष वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तर ती बदलण्यासाठी तुम्हाला ती वस्तू विकणाऱ्या कंपनीच्या सर्विस सेंटरमध्ये जावं लागेल.

  • Amazon-Flipkart ने आता डिजिटल उत्पादनांवरील 7 दिवसांचे प्रोडक्ट्स बदलण्याची पॉलिसी थांबवली आहे.


घरबसल्या वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही


आता घरात बसून वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सुविधा मिळणार नाही. या दोन्ही प्लॅटफॉर्मने त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर 7 दिवसांची पॉलिसी बदलून 7 दिवस सर्विस सेंटर पॉलिसी करण्यात आली आहे. 


हे लक्षात ठेवा


तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड्स यांसारखे कोणतेही डिजिटल उत्पादन Amazon -Flipkart वरून ऑर्डर करण्याचा विचार करत असाल, तर या उत्पादनांच्या कंपनीच्या जवळच्या सेवा केंद्राची खात्री करून घ्या.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता