Vivo V30 and Vivo V30 Pro : दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर लोकप्रिय स्मार्टफोन, Vivo V30 ची लॉंन्चची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 7 मार्च रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये Vivo 30 आणि Vivo 30 Pro सीरीजचा समावेश आहे. लॉन्च होण्यापूर्वी, फोनशी संबंधित काही डिटेल्स लीक झाले होते. आता या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) कोणते फीचर्स आहेत जे नवीन पाहायला मिळतील? त्यांची वैशिष्ट्ये कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
विवो कंपनी स्मार्टफोनच्या लीक झालेल्या टीझरबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोन सीरिजच्या टॉप सेंटरमध्ये पंच होल कटआऊट असेल. हा कटआऊट सेल्फी कॅमेऱ्यासाठी ठेवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विवो या स्मार्टफोन सीरीजमध्ये कर्ल AMOLED डिस्प्ले देखील देण्याची शक्यता आहे. जे कंपनीने आपल्या मागील स्मार्टफोन सीरीजमध्ये दिले होते.
7 मार्चला होणार लॉन्च
Vivo ने घोषणा केली की Vivo V30 आणि V30 Pro भारतात 7 मार्च रोजी लॉन्च होणार आहेत, ज्याची लॉन्चची वेळ दुपारी 12 वाजता ठेवण्यात आली आहे. या फोनचे लाईव्ह लॉन्च फ्लिपकार्टवर होणार आहे. यापूर्वी, कंपनीने असेही सांगितले होते की या फोनमध्ये अंदमान ब्लू, पीकॉक ग्रीन आणि क्लासिक ब्लॅक कलरचे तीन पर्याय असतील.
Vivo V30 ला मिळालेली सर्टिफिकेशन्स
लीक झालेल्या रिपोर्टमध्ये हे देखील समोर आले आहे की Vivo V30 स्मार्टफोनचे बेझल खूप स्लिम असतील. फोनच्या मागील बाजूस स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल असेल आणि उजव्या बाजूला पॉवर बटणासह व्हॉल्यूम रॉकर्सचा समावेश असेल. Vivo V30 स्मार्टफोनला NBTC, TDRA, IMDA आणि FCC सारखी अनेक प्रमाणपत्रे मिळाली आहेत. याशिवाय Vivo कंपनी Vivo V30e देखील भारतीय बाजारात लॉन्च करू शकते, कारण Vivo ने Vivo V29 सीरीज मध्ये V29e देखील लॉन्च केला होता.
'ही' असतील खास वैशिष्ट्य
Vivo V30 Lite 5G आधीच मेक्सिकोमध्ये लॉन्च झाला आहे. येथे लॉन्च झाल्यानंतर या फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. या फोनमध्ये 6.67 इंच E4 AMOLED डिस्प्ले, फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेट, 12GB स्टोरेज, 256GB स्टोरेज, 64MP बॅक कॅमेरा सेटअप, 50MP फ्रंट कॅमेरा सेटअप, 4800mAh बॅटरी आणि 4.4W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या :