Apple iPhone Update : Apple iPhone ची क्रेझ तरूणाईत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंपनीदेखील आयफोनबाबत (iPhone) अनेक नवीन अपडेट्स समोर घेऊन येत असते. आयफोनच्या या सीरिजमध्ये जे यूजर्स नो-प्रो व्हर्जन खरेदी करणार आहेत अशा यूजर्ससाठी महत्त्वाची माहिती आहे. कंपनीने यावेळी नवीन अपडेट Apple च्या iPhone 17 आणि 17 Plus साठी नवीन अपडेट समोर आणलं आहे. 


आयफोनमध्ये कोणकोणते फीचर्स असू शकतात? 


आगामी iPhone 17 मालिकेत LTPO OLED पॅनेल मिळणे हा एक मोठा बदल आहे. हे पॅनेल फक्त स्मूद स्क्रोलिंग किंवा अधिक डायनॅमिक व्हिज्युअल प्रदान करणार नाहीत. उलट, ते नेहमी-ऑन डिस्प्ले फंक्शनला देखील समर्थन देईल. 1Hz पर्यंत रिफ्रेश रेट समायोजित करण्याची पॅनेलची क्षमता तुम्हाला बॅटरी न संपवता महत्वाची माहिती प्रदर्शित करण्यास अनुमती देईल.


खरंतर, आयफोन 17 आणि 17 प्लस यावेळी यूजर्स आकर्षण ठरू शकतात. हे फोनच्या 120Hz प्रोमोशन डिस्प्लेमुळे असू शकते. हे वैशिष्ट्य पूर्वी महाग मॉडेल्सपुरते मर्यादित होते. खरंतर, हे विशेष वैशिष्ट्य हाय-एंड प्रोडक्टसाठी आणले आहे. अशा परिस्थितीत, हे विशेष फीचर आता नॉन-प्रो व्हेरिएंटसाठी आणले जाऊ शकते.


स्वस्त मॉडेल्सना मिळणार Always-On-Display


या अपडेटनंतर असे मानले जाऊ शकते की कंपनीच्या स्वस्त मॉडेल्समध्ये नेहमी-ऑन-डिस्प्ले सुविधा उपलब्ध होऊ शकते. LTPO OLED पॅनेल आयफोन 17 मालिकेत एक मोठा बदल असू शकतो. तसेच, या प्रकारचे पॅनेल स्मूद स्क्रोलिंग किंवा अधिक डायनॅमिक व्हिज्युअलसाठी वापरले जात नाही. खरंतर ते नेहमी ऑन डिस्प्ले फंक्शनसाठी कार्य करते.


हे खास फंक्शन कसं कार्य करते? 


हे वैशिष्ट्य पॅनेलच्या क्षमतेनुसार रिफ्रेश दर अॅडजस्ट करण्यास अनुमती देतात. रीफ्रेश दर 1Hz पर्यंत कमी होऊ शकतो. खरंतर, अशा वैशिष्ट्याचा उद्देश हा आहे की, यूजर्स कोणतीही महत्त्वाची माहिती चुकवू नये. आवश्यक माहिती मिळण्याबरोबरच बॅटरी निकामी होण्याच्या समस्येकडेही लक्ष दिले जाते.


नवीन अपडेट केव्हा समोर येणार?


या पद्धतीचा ट्रान्जिशन डिस्प्ले निर्माता BOE सह अॅपलच्या भागीदारीवर अवलंबून आहे. दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीमुळे, 2025 पर्यंत असे बदल अपेक्षित आहे. तसेच, आयफोन 17 लाईनअपची मागणी पूर्ण करणे हे BOE चे खरे आव्हान असणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता