Whatsapp : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात लोकप्रिय अॅप व्हॉट्सअपकडून (Whatsapp) प्रत्येक महिन्याला रिपोर्ट जारी करण्यात येतो. या रिपोर्टनुसार, ज्या यूजर्सनी व्हॉट्सअपच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे अशा लोकांचं व्हॉट्सअप अकाऊंट बंद केलं जातं. हे काम यूजर्सच्या सुरक्षेचा विचार लक्षात ठेवूनच केलं जातं. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपचा वापर करताय त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपचे नियम माहीत असणं गरजेचं आहे. जेणेकरन तुम्ही तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवू शकाल. या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुमचंही अकाऊट बंद होऊ शकतं. 


तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट बंद होऊ नये यासाठी या 8 गोष्टींची काळजी घ्या.


1. तुम्ही सतत स्पॅमसाठी व्हॉट्सअपचा वापर करत असाल तर वेळीच थांबा. कारण, असे मेसेजेस पसरवण्यासाठी अनेक लोक व्हॉट्सअप ग्रूपचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. 


2. जर यूजर्सने दिवसातून अनेक वेळा तक्रार केली असेल तर तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं.


3. जर तुम्ही अनेक वेगवेगळ्या ग्रुपशी संबंधित असाल आणि त्यामध्ये खोट्या बातम्या पसरवत असाल तर तुम्हाला वेळीच काम थांबवणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. 


4. एपीके फाईल्स Android फोनवर डाउनलोड केल्या जाऊ शकतात. अशा फाईल्समध्ये मालवेअर असतात. बऱ्याच वेळा हे ॲप स्वतःच इतर यूजर्सना लिंक पाठवतात. अशा परिस्थितीत एपीके फाईल्स डाऊनलोड करणे टाळा.


5. जर तुम्ही दुसऱ्याच्या नावाने अकाऊंट तयार केलं असेल आणि कंपनीला त्याची माहिती मिळाली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.


6. जर तुम्ही WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus सारखे थर्ड पार्टी ॲप्स डाऊनलोड केले असतील तर तुमचे मूळ WhatsApp अकाऊंट बॅन केले जाऊ शकते.


7. जर खूप लोकांनी तुमच्या अकाऊंटची तक्रार केली किंवा खूप लोकांनी तुमच्या अकाऊंटविरूद्ध तक्रार केली, तर तुमच्या अकाऊंटवर बंदी येऊ शकते. 


8. तुम्ही इतर कोणत्याही यूजर्सला बेकायदेशीर, अश्लील किंवा धमकी देणारे संदेश पोस्ट केल्यास तुमच्या खात्यावर बंदी घातली जाऊ शकते.


यासाठी व्हॉट्सअप वापरताना संबंधित गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचं अकाऊंट बॅन होऊ शकतं. यासाठी काळजी घ्या. 


महत्त्वाच्या बातम्या :


Tecno ने लॉन्च केला Robot Dog; कॅमेरा आणि दुर्बिणीसह पेट डॉगप्रमाणे तुमची सगळी कामं करणार; कसा दिसतो पाहाच