मुंबई : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecome Company) स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक कंपनीला आपले युजर्स सर्वाधिक असावेत असंच वाटतं. पण ग्राहकांना त्या सुविधा आवडणही तितकच महत्त्वाचं असतं. भारतातील नंबर वन टेलिकॉम कंपनी सध्या रिलायन्स जिओ आहे. कंपनीचा यूजर बेस सतत वाढत आहे.पण व्होडाफोन (Vodafone) आणि आयडियाला (IDEA) गेल्या अनेक महिन्यांपासून यूजर बेसच्या बाबतीत प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. कमी होत जाणारा यूजर बेस वाढवण्यासाठी कंपनीने एक नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केलाय.
ARPU वाढवण्यासाठी महागड्या प्लॅन्स सोबत ओटीटीचा देखील पर्याय
हल्ली टेलिकॉम कंपन्या प्रीपेड प्लॅनसह OTT अॅप्सचा पर्याय देखील उपलब्ध करुन देतात. कारण आजकाल प्रत्येकजण या अॅप्सचा वापर करतो. Vi, Airtel किंवा Reliance Jio असो, सर्वजण त्यांच्या योजनांसह काही OTT अॅपला सपोर्ट करत आहेत.काही काळापूर्वी रिलायन्स जिओने वार्षिक प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता ज्यामध्ये कंपनी Jio सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येतं. कंपन्या त्यांचे ARPU वाढवण्यासाठी अशा योजना लाँच करतात.
ARPU म्हणजे काय?
ARPU म्हणजे प्रत्येक टेलिकॉम कंपनीचे Average Revenue Per User. यामध्ये कंपनीला प्रत्येक युजर्समागे मिळणाऱ्या कमाईवरुन त्यांचे सरासरी उत्पन्न काढले जाते. सध्या बऱ्याच टेलिकॉम कंपन्या या त्यांचे युजर्स आणि Average Revenue Per User वाढवण्यासाठी अनेक नवीन प्लॅन्स ग्राहकांसाठी आणत असतात. त्यामुळे कंपनीला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. सध्या रिलायन्स जिओचा Average Revenue Per User हा सर्वाधिक असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर बराच परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं.
काय आहे VI चा नवा प्लॅन?
आता Vodafone Idea ने Rs 3,199 चा वार्षिक प्लान लॉन्च केला आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 365 दिवसांसाठी Amazon Prime Video सबस्क्रिप्शन, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS आणि 2GB दैनिक डेटाचा लाभ मिळेल. रिलायन्स जिओ आणि एअरटेल देखील ग्राहकांना असेच प्रीपेड प्लॅन ऑफर करतात.
जिओच्या या प्लॅनमध्ये मिळतं नेटफ्लिक्सचं मोफत सबस्क्रिप्शन
Reliance Jio ने गेल्या आठवड्यात Rs 1,499 चा प्रीपेड प्लान लाँच केला होता ज्यामध्ये कंपनी दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 84 दिवसांच्या वैधतेसह Netflix सबस्क्रिप्शन ऑफर केलं जातं.