Oppo A59 5G : ओप्पोने भारतीय ग्राहकांसाठी Oppo A59 5G लाँच केला आहे. आज या 5जी स्मार्टफोनचा पहिला सेल ठेवण्यात आला आहे. फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासून लाइव्ह झाला आहे. जर तुमचं बजेट 15 हजार रुपयांपर्यंत असेल तर हा फोन खरेदी करता येईल. ओप्पोचा नवीन लाँच झालेला फोन ब्लॅक आणि सिल्क गोल्ड या दोन कलर ऑप्शनसह आणला आहे.
Oppo A59 5G किंमत आणि सूट
ओप्पोचा नवा स्मार्टफोनOppo A59 5G कंपनीने 14, 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर केला आहे. Oppo A59 5G 4 जीबी रॅम/128 जीबी चा टॉप व्हेरियंट16,999 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. मात्र, पहिल्या सेलमध्ये हा फोन 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. या किंमतीत फोनचा 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरियंट खरेदी करता येईल.
काय आहेत ऑफर्स-
-IDFC FIRST Bank Credit Card द्वारे EMI ट्रांजेक्शन केल्यास तुम्हाला 1,500 पर्यंत सूट मिळू शकते.
-जर तुम्ही OneCard Credit Card and Credit EMI ट्रांजेक्शन करत असाल तर तुम्हाला 750 पर्यंत सूट मिळू शकते.
-फ्लिपकार्टवरून Oppo A59 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास ११,७०० रुपयांपर्यंत ऑफ एक्सचेंज ऑफर मिळू शकते.
-Oppo A59 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.
Oppo A59 5G फिचर्स कोणते?
-Oppo A59 5G स्मार्टफोन कंपनीने MediaTek Dimensity 6020 chipset सह लाँच केला आहे.
-ओप्पोचा हा फोन 4GB/6GB रैम, 128GB स्टोरेजसह खरेदी करता येईल.
-Oppo A59 5G स्मार्टफोन मध्ये 13MP+2MP बैक आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
-ओप्पोचा हा फोन 6.56 इंचाची 90Hz सनलाइट स्क्रीन, 720 nits ब्राइटनेससह येतो.
-कंपनीने नव्याने लाँच केलेल्या फोनमध्ये 33W SUPERVOOC फ्लॅश चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
OPPO Reno 11 Pro लाँच, जाणून घ्या फिचर्स
ओप्पोने आपली रेनो सीरिज नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केली होती. त्यांचा ओप्पो रेनो 11 नुकताच टीडीआरए, बीआयएस, एफसीसी (OPPO Reno 11 Pro Features)आणि गीकबेंच वेबसाइटवर लाँच करण्यात आला होता. तर आता ओप्पो रेनो 11 प्रोला एनबीटीसी, बीआयएस, सिरिम आणि एसडीपीपीआय सर्टिफिकेशन मिळालं आहे. या फोनचे भारत आणि ग्लोबल लाँचिंग लवकरच होणार असल्याची माहिती आहे.
ओप्पो रेनो 11 प्रो ला एनबीटीसी प्रमाणपत्रावर CPH2607 मॉडेल क्रमांकासह पाहिले गेले आहे. या लिस्टिंगमध्ये डिव्हाइस 5G नेटवर्क सपोर्ट फिचर असल्याचं सांगितलं जात आहे. रेनो 11 प्रोच्या सिरिम, बीआयएस आणि एसडीपीपीआय लिस्टिंगबद्दल बोलायचे झाले तर त्यात फक्त मॉडेल नंबर समोर आला आहे. आयएमडीए प्रमाणपत्रावर मोबाइल एनएफसी सपोर्ट असेल असे दिसून आले आहे. काही दिवसांत प्लॅटफॉर्मवर येऊन हा स्मार्टफोन लवकरच भारतात आणि जागतिक स्तरावर लाँच केला जाईल, अशी माहिती आहे.
इतर महत्वाची बातमी-
Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर