मुंबई : ट्विटर (Twitter) म्हणजे एक्स (X) मीडिया वापरणं आता महागडं ठरणार आहे. ट्विटर युजर्सना आता एक्स (X) वर पोस्ट (Post) लिहिण्यासाठी, लाईक (Like) करण्यासाठी आणि रिप्लाय (Reply) म्हणजे देण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी यासंबंधित मोठी घोषणा केली आहे. एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर आता शुल्क आकरण्यात येणार असल्याने सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना धक्का बसला आहे.
एलॉन मस्क यांना ट्विटर एक्स युजर्सना झटका
एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्वीटर (Twitter) प्लॅटफॉर्मवर दररोज नवीन बदल होताना दिसत आहे. एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून त्यांनी अनेक बदल केले आहेत. आता एलॉन मस्क यांनी एक्स (X) म्हणजेच ट्विटर यूजर्सना मोठा झटका दिला आहे. आता X नवीन युजर्ससाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजेच ट्विटर वापरण्यासाठी एक निश्चित शुल्क जाहीर करण्यात येणार आहे.
मोठा बदल होण्याची शक्यता
एलॉन मस्क यांनी अलीकडेच X मीडियावरील बदलासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मात्र, ही योजना गेल्या वर्षीच ऑनलाइन आली होती. पण एलॉन मस्क यांनी सोमवारी एका यूजरच्या पोस्टला उत्तर देताना याची पुष्टी केली. पोस्टने टेक्स्ट अपडेटबाबत स्पष्टी केलं आहे. मस्क यांनी सांगितलं की, युजर्स सोशल मीडियावर पोस्ट, लाईक, बुकमार्क आणि रिप्लाय करण्यासाठी एक लहान वार्षिक शुल्क देण्यास सहमत आहेत.
लाईक्स, पोस्ट इत्यादीसाठी पैसे द्यावे लागणार
एलॉन मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, नवीन X युजर्संना ट्विटर जॉईन करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. X वर पोस्ट करणे, लाईक करणे, कोणत्याही ट्विटला उत्तर देणे किंवा X वर बुकमार्क करणे यासाठी पैसे द्यावे लागतील. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर युजर्सनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये चाचणी घेण्यात आली
X वर नवीन वापरकर्त्यांना ट्विट करण्यासाठी वार्षिक शुल्क आकारण्याची योजना न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये चाचणी म्हणून सुरू करण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली. युजर्सनी या निर्णयाचे कौतुक करत ट्वीटसाठी निश्चित रक्कम भरली आणि ट्वीटही केलं.
बनावट अकाऊंटपासूनही दिलासा मिळणार
मस्क यांनी सांगितलं की, एक्स मीडिया वापरण्यासाठी वार्षिक फी भरल्यानंतर तुम्ही आता ट्वीट करण्यास मोकळे व्हाल. त्यानंतर, युजर्सकडून ट्वीटसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ट्विटरवर पेमेंट शुल्क लागू केल्याने ट्विटरवरील बनावट खात्यांचा धोकाही कमी होईल.