Twitter Down Globally : मागील एका तासापासून जगभरात मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाल्याचं दिसून येतंय. ट्विटरचे अनेक यूजर्स त्यांच्या पेजवर कोणतेही नवीन ट्वीट पाहू शकत नाहीत. यासंबंधी अनेक लोकांनी आपल्या तक्रारी व्यक्त केल्या असून सोशल मीडियावर #TwitterDown चा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. इलॉन मस्क यांनी मालकी घेतल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटर डाऊन झालं आहे.
Twitter Down: इलॉन मस्कचा ताबा अन् चौथ्यांदा ट्विटर डाऊन
या आधी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, ट्विटरची सेवा काही तासांसाठी बंद झाली होत. त्यावेळीही यूजर्संना कोणताही नवीन मेसेज दिसत नव्हता किंवा ते कोणतीही नवीन पोस्ट करु शकत नव्हते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून ट्विटर प्लॅटफॉर्म अनेक वेळा तांत्रिक समस्यांना बळी पडले आहे आणि काहीवेळा तासनतास डाऊन झाले आहे. सध्या प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यामुळे ट्विटरवरून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Twitter Down Memes Viral : ट्विटर डाऊन आणि मीम्स व्हायरल
ट्विटर डाऊन झाल्यानंतर मात्र फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर मात्र भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
ट्विटरचे नवे सीईओ ईलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, त्यांची टीम ट्विटर यूजर्सना येत असलेल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मात्र यावेळी देखील जगभरात ट्विटर डाऊन आहे आणि #TwitterDown वेगाने ट्रेंड करत आहे. कोणतेही नवीन फीड Twitter वर दिसत नाही. रिफ्रेश केल्यानंतरही जुने ट्वीट दिसत आहे.
ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं
ट्विटरने नुकतेच 200 लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. याआधीही ट्विटरने हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. उत्पादन व्यवस्थापक, अभियंते आणि डेटा सायंटिस्ट विभागातील लोक 200 कर्मचाऱ्यांमध्ये आहेत ज्यांनी आपली नोकरी गमावली आहे. ब्लू व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शनच्या प्रमुखालाही कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच ट्विटरच्या सेल डिपार्टमेंटच्या हेडचीही नोकरी गेली आहे.
ही बातमी वाचा: