AI Voice Clone : वाढत्या तंत्रज्ञानासोबत (Technology) अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. एकीकडे तंत्रज्ञानात मोठी प्रगती होत आहे तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करुन लोकांना सर्रास फसवले जात आहे. आता लोकांना फसवण्याकरता AI Tool चा वापर केला जात आहे. आजकाल आपकल्याच ओळखीच्या लोकांपैकी कोणाचा तरी आवाज रेकाॅर्ड करुन फसवले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या संबंधी बातमी हरियाणातून समोर आली होती. त्यात एका व्यक्तीची अशाच पद्धतीने 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक करणार्‍याने एआय व्हॉईस क्लोन टूलचा वापर केला आणि त्या व्यक्तीचा मित्र असल्याचे भासवून पैशांची फसवणूक केली. अशी फसवणूक कशी टाळायची हे जाणून घेऊया.


एका रिपोर्टनुसार, अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये 83 टक्के भारतीयांनी त्यांचे पैसे गमावले आहेत. पैसे मागण्याकरता जो काॅल येतो तो आवाज खरा आहे की खोटा हे लोकांना समजत नाही. 


स्वत:ला असे सुरक्षित ठेवा


अनोळखी नंबरवरुन येणारे काॅल उचलू नका. जर तुम्ही असे काॅल उचलेले तर समोरच्या व्यक्तीची ओळख पटवून घ्या. ओळख पटल्यानंतरच स्वत:ची माहिती समोरच्या व्यक्तीला द्या. ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला आणि इतर व्यक्तीला माहित असलेल्या काहीतरी गोष्टींची विचारणा करणे. 


आवाज काळजीपूर्वक ऐका


कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा काॅल आल्यास पहिल्यांदा आवाज काळजीपूर्वक ऐका. ज्याने काॅल केला आहे त्या व्यक्तीच्या अगदी बारिक-सारिक गोष्टींकडे नीट लक्ष द्या. कॉलर कसा पॉज घेत आहे, आवाज कसा येत आहे, शब्द कसे उच्चारले जातात इत्यादी बाबी जाणून घ्या.


पैसे मगितल्यास व्यक्तीची नीट पडताळणी करा


जर तुम्हाला कोण काॅलवर पैसे मागितले तर वेळीच सावधान व्हा. काॅल तात्काळ कट करा. काॅल केलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल तर लगेच संपूर्ण चौकशी करा आणि मगच योग्य ती कारवाई करा. जाणून घेतल्याशिवाय अशी कोणतीही कृती करु नका. 


ऑडिओ क्लिप अपलोड करु नका


कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमची ऑडिओ क्लिप अपलोड करु नका. तुम्ही असे केल्यास तुमच्या आवाजाचे क्लोनिंग करुन कोणीही गैरफायदा घेऊ शकते. 


एआय व्हाईस क्लोनिंग धोकादायक का आहे ?


जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट असतो. जसे प्रत्येकाचे बोटाचे ठसे वेगळे असतात तसाच प्रत्येक व्यक्तीचा आवाज देखील वेगळा आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने बोलल्यास त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. भारतातील प्रौढ असलेले अनेक लोक आठवड्यातून एकदातरी सोशल मीडियावर आपला आवाजाचा व्हिडीओ अथवा ऑडिओ टाकतात. प्रेयसी, प्रियकर अथवा आई-वडील किंवा मित्रांना रिप्लाय देताना आपण व्हाईस नोट पाठवतोच. याचाच वापर करुन सायबर गुन्हेगार एआयच्या मदतीने तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आवाजात फोन करतात. त्यामुळे व्हाईस क्लोनिंग सायबर गुन्हेगारांसाठी मोठं शस्त्र झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Smartphoes Tips : सायलेंट मोडवर असलेला अँड्रॉइड फोनही शोधता येईल; फक्त ‘हे’ फिचर वापरा