Meta's AudioCraft AI : सध्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात AI ची चर्चा सुरू आहे. प्रत्येक कंपनी आजकाल AI चा वापर करताना दिसत आहे. मेटा नेहमीच आपल्या यूजर्सकरता काही ना काही नवीन प्रयोग करत असते. आता मेटा ने यूजर्सकरता पुन्हा एकदा नवीन फिचर आणले आहे. मेटा ने वापरकर्त्यांसाठी एक अप्रतिम ओपन सोर्स एआय टूल लाँच  केले आहे.या टूलचे नाव आहे ऑडिओक्राफ्ट (Audiocraft) व्यावसायिक संगीतकार आणि संगीत बनवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांना या साधनाचा मोठा फायदा होणार आहे. हे टूल कसे काम करते हे जाणून घेऊयात.


हे AI Tool तीन माॅडेलमध्ये देण्यात आले आहे


मेटा (Meta) ने तीन माॅडेलमध्ये AI Tool लाँच केले आहे. AudioGen, MusicGen आणि EnCodec असे हे माॅडेल्स आहेत. यातील MusicGen माॅडेल तुम्ही टाईप केलेल्या Text चे रूपांतर गाण्यात करेल. तर AudioGen ला पब्लिक साऊंड इफेक्टची ट्रेनिंग देण्यात आली आहे. जे प्रामुख्याने Text इनपुटच्या मदतीने ऑडिओ जनरेट करण्याचे काम करेल. EnCodec मध्ये सुधारणा करण्यात आली असून या टूलच्या मदतीने तुम्ही उच्च दर्जाचे संगीत तयार करू शकाल.



या Tool चा वापर कसा करता येईल


मेटाने हे एआय टूल ओपन सोर्समध्ये ठेवले आहे. म्हणजेच, कोणीही त्यांच्या डेटासेटच्या आधारे या एआय टूलला प्रशिक्षण देऊ शकतो. कंपनीने सांगितले की AI ने फोटो, व्हिडिओ आणि मजकूरात वेगाने प्रगती केली आहे, परंतु ऑडिओच्या भागात  एआयचा फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे कंपनीने ऑडिओक्राफ्ट लाँच केले आहे. जे उच्च दर्जाचे ऑडिओ तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. या एआय टूलच्या मदतीने यूजर्स त्यांच्या कामात अनेक गोष्टींचा आवाज वापरू शकतात. जसे कुत्र्याचे भुंकणे, पक्ष्यांचा किलबिलाट इ. तसेच हे AI Tool लॉन्च केल्यावर, काही कलाकार आणि उद्योग तज्ञांनी कॉपीराइट उल्लंघनाबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. 


तर  काही दिवसांपूर्वी LinedIN ने देखील एका नव्या AI Tool विषयी सांगितले होते. LinkedIn एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या जॉब अॅप्लिकेशन्स तयार करण्यात मदत करण्यासाठी AI चा वापर करेल. अहवालानुसार, LinkedIn एका वैशिष्ट्याची चाचणी करत आहे जे नोकरी शोधणाऱ्यांना कसे लिहायला हवे हे सांगण्यात मदत करेल आणि  ते हायरिंग मॅनेजरला पाठवू शकतात. त्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढू शकतात. वापरकर्ते कव्हर लेटरसारखे संदेश तयार करू शकतील जे लहान आणि टू-द-पॉइंट असतील असे सांगण्यात आले आहे.