Tecno Dynamic 1 Robot Dog : स्पेन (Spain) शहरातील बार्सिलोनामध्ये सध्या टेक (Tech) विश्वातील सर्वात मोठा इव्हेंट सुरु आहे. मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस (Mobile World Congress) असं या इव्हेंटचं नाव आहे. 26 ते 29 फेब्रुवारीपर्यंत हा इव्हेंट सुरु असणार आहे. या इव्हेंटमध्ये टेक्नो कंपनीने अनेक खास प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. या इव्हेंटमध्ये टेक कंपन्यांनी मोबाईलच्या व्यतिरिक्तही अनेक गोष्टींवर भर टाकला आहे. यामध्ये इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्सवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यामधला एक डायनॅमिक 1 रोबोट डॉग देखील आहे. 


टेक्नोने लॉन्च केला रोबोट डॉग 


डायनॅमिक 1 रोबोट डॉग या नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की हा श्वानाच्या रूपातील एक रोबोट आहे. याच्या माध्यमातून यूजर्स आपल्या स्मार्टफोन, वॉईस कमांड, रिमोट कंट्रोलसह अनेक प्रकारे नियंत्रित करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा रोबोट डॉग अगदी असली पेट डॉगप्रमाणेच तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्याप्रमाणे काम करतो. हा डॉग उड्या मारू शकतो, वर चढू शकतो, खाली उतरू शकतो, पायऱ्यांचा वापर करू शकतो, हाथ मिळवू शकतो आणि अन्य पाळीव श्वानाप्रमाणेच आपल्याला हाताला धरून उभा देखील राहू शकतो. 


कंपनीने या श्वानाला भविष्यकाळासाठी एक परफेक्ट श्वान म्हटलं आहे. तसेच, कंपनीने असं देखील म्हटल आहे की, टेक्नो डायनॅमिक 1 रोबोट डॉगला एआय (AI) टेक्नॉलॉजीच्या आधारे बनविण्यात आलं आहे. यामध्ये 15,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या रोबोट डॉगची मशीन एका अनस्पेसिफाईड ऑक्टा-कोर चिपसेटवर चालतो. यामध्ये इंटेलचा Realsense D430 कॅमेरा देण्यात आला आहे. टेक्नोच्या या रोबोटिक डॉगकडे एक दुर्बिणदेखील देण्यात आलेली आहे. या दुर्बिणीच्या माध्यमातून डॉग लांबच्या गोष्टी देखील पाहू शकणार आहे. याच्याच व्यतिरिक्त हा इन्फ्रारेड सेंसरसह सुद्धा येतो. हा 45Nm/Kg टॉर्क आऊटपुटसह येतो. याबरोबरच हा डॉग अनेक शारीरिक कामही करू शकतो. 


रोबोट डॉग कधी लाँच होणार?


कंपनीने हे प्रोडक्ट नेमकं कधी लॉन्च होणार या संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. तसेच, Tecno Dynamic 1 चे व्यावसायिकरण देखील केले जाणार नाही अशी शक्यता आहे. कंपनीच्या संशोधन आणि विकासाचा आणि प्रगती सिद्ध करणारा एक तांत्रिक नमुनाच राहू शकतो. पण, भविष्यात एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून एक अद्भूत पेट डॉग देखील तयार केला जाऊ शकतो हे या माध्यमातून दिसून येतं. 


महत्त्वाच्या बातम्या :


Samsung Galaxy : 13 दिवसांचा बॅटरी पॅक आणि भन्नाट फीचर्ससह Samsung Galaxy Fit 3 फीटनेस ट्रॅकर भारतात लॉंच