मुंबई : व्हॉट्सअॅप (Whatsapp) सध्या एका नव्या फिचरवर (New Feature) काम करत आहे. सध्या व्हॉट्सअॅपचे जगभरात 2 अब्जाहून अधिक युजर्स आहेत. त्यामुळे या युजर्सना सोशल मीडियाचा चांगला अनुभव येण्यासाठी कंपनी वेळोवेळी अॅप अपडेट करते आणि त्यामध्ये बदल करते. दरम्यान, कंपनी एका नवीन फीचरवर सध्या काम करत आहे. हे फिचर सध्या काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. खरंतर व्हॉट्सअॅप स्टेटस सेट करण्यासाठी स्टेटस टॅबखाली 2 नवीन पर्याय देण्यात येणार आहे. सध्या काय होते की स्टेटस अपडेट करण्यासाठी स्टेटस टॅबवर जाऊन कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावे लागते. त्यानंतर स्टेटस अपडेट करता येतो. 


पण नवीन अपडेटमध्ये स्टेटस टॅब अंतर्गत दोन नवीन पर्याय देण्यात येणार आहे. ज्यामध्ये युजर्सना वरच्या उजवीकडे कॅमेरा चिन्ह आणि एक पेन्सिल बटण दिसेल.येथून तुम्ही सहजपणे स्टेटस सेट करू शकाल. जर तुम्हाला कोणतीही मीडिया फाइल टाकायची असेल तर तुम्हाला कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावे लागेल आणि जर तुम्हाला कोणताही मजकूर शेअर करायचा असेल तर तुम्हाला पेन्सिल बटणावर क्लिक करावे लागेल.नवीन अपडेटद्वारे कंपनी स्टेटस शेअर करण्यासाठी अधिक सोपं होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे फिचर हवे असेल तर बीटा  व्हर्जन डाऊनलोड करु शकता. 


या फिचरवरही सुरु आहे काम 


व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे युजरनेम फीचर. या फीचरच्या मदतीने तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये एकमेकांना अॅड करू शकाल. युजरनेम फीचर इन्स्टाग्राम सारखेच असेल जिथे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे नाव असेल. अलीकडेच कंपनीने WhatsApp मध्ये ईमेल लिंक आणि मल्टीअकाऊंट फीचरला सपोर्ट केले आहे. तुम्ही आता एकाच अॅपवर 2 अकाऊंट चालवू शकता.


इन्स्टाग्रामचे येणार नवे फिचर 


सध्या प्रत्येक वयोगटामध्ये लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने नाताळच्या आधी युजर्ससाठी एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरमुळे युजर्सना त्यांच्या स्टोरी सेक्शनमध्ये Add Yours नावाच्या  टेम्प्लेटचा पर्याय दिला आहे.याचा अर्थ असा की तुमच्या स्टोरीशिवाय तुमच्या आवडीनुसार कोणताही टेम्पलेट सेट करू शकता आणि Add Yours च्या माध्यमातून तुमचे फॉलोअर्सही त्यात सहभागी होऊ शकतात. म्हणजे ते त्यांचे फोटो वगैरेही पोस्ट करू शकतात.


हेही वाचा : 


Facebook Instagram Privacy:  इन्स्टाग्राम, फेसबुकची तुमच्या फोनवर करडी नजर; आताच Privacy Setting करुन घ्या, नाहीतर ....