मुंबई : सध्या प्रत्येक वयोगटामध्ये लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने (Instagram) नाताळच्या आधी युजर्ससाठी एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरमुळे युजर्सना त्यांच्या स्टोरी सेक्शनमध्ये Add Yours नावाच्या  टेम्प्लेटचा पर्याय दिला आहे.याचा अर्थ असा की तुमच्या स्टोरीशिवाय तुमच्या आवडीनुसार कोणताही टेम्पलेट सेट करू शकता आणि Add Yours च्या माध्यमातून तुमचे फॉलोअर्सही त्यात सहभागी होऊ शकतात. म्हणजे ते त्यांचे फोटो वगैरेही पोस्ट करू शकतात.


तुम्ही तुमच्या फॉलोअर्साठी जर टेम्पलेटचा ऑप्शन चालू केला असेल, त ते टेम्पलेट तुमचे फॉलोअर्स देखील वापरु शकतात. या अपडेटची माहिती इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलवर शेअर केली आहे. आजपासून हे फिचर  जागतिक स्तरावर उपलब्ध झाले आहे."आज, आम्ही तुमचे स्वतःचे अॅड-तुमचे-स्वतःचे टेम्पलेट्स तयार करण्याचे फिचर लाँच केले आहे, असं त्यांनी म्हटलं.  


तुम्ही GIF, मजकूर आणि गॅलरीमध्ये तुमचा फोटो पिन करुन तुमच्या स्वत:चे  टेम्पलेट विकसित करु शकता. तुम्ही तयार केलेले टेम्प्लेट जर कोणी शेअर केले तर त्याचे क्रेडिट तुम्हाला दिले जाईल. यामुळे लोकांना त्यांच्या स्टोरी आणखी आकर्षक करण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


असं बनवा तुमचं टेम्पलेट


तुमचा स्वतःचं टेम्पलेट तयार करण्यासाठी, प्रथम Instagram वरील स्टोरी सेक्शनमध्ये जा आणि तुम्हाला शेअर करायचा असलेला कोणताही फोटो निवडा. यानंतर, टेक्स्ट आयकॉनच्या पुढे दिसणार्‍या स्टिकर पर्यायावर क्लिक करा आणि शीर्षस्थानी Add Yours वर क्लिक करून कोणताही टेम्पलेट निवडा. कंपनीने अनेक नवीन वर्ष आणि वर्षाच्या शेवटी टेम्पलेट्स देखील जोडल्या आहेत ज्यातून तुम्ही निवडू शकता.


टेम्पलेट निवडल्यानंतर, तुम्ही त्यात उपस्थित असलेला फोटो किंवा मजकूर पिन किंवा अनपिन करू शकता. पिन केल्यानंतर, कोणीही मजकूर किंवा फोटो वापरु शकणार नाही.  म्हणजे, जर तुम्ही तुमचा नवीन वर्षाचा टेम्प्लेट तयार केला असेल आणि तो पिन केला असेल, तर समोरच्या व्यक्तीला त्यात सहभागी होता येईल पण ते ख्रिसमसच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही इव्हेंट किंवा गोष्टीसाठी ड्राफ्ट करता येणार नाही.  


हेही वाचा : 


Galaxy S24 Series : iphone चं फिचर आता Galaxy S24 Series मध्ये; किती आहे फोनची किंमत? कधी होणार लाँच? जाणून घ्या