Solar Syatem Is Live On Nasa Website : आज संपूर्ण जग विकासची वाट चालत आहे आणि या विकासाच्या व तंत्रज्ञानाच्या आधारेच माणूस केवळ पृथ्वी पुरतीच मर्यादित राहिला नाही, तर अवकाशात ही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत यात नासाचे मोठे श्रेय आहे. नासा ही संपूर्ण जगातील सर्वोत्तम अंतराळ संस्थापैकी एक आहे. आपल्या सौरमालेतील ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि त्यापुढील ग्रहांसह अवकाशाचा शोध घेणे हे नासाच्या प्राथमिक उद्दिष्ट आहे. आपली सूर्यमाला नेमकी कशी काम करते? सूर्यमाला कशी दिसते? याबद्दल आपल्याला मोठी उत्सुकता असते. पण आता आपण आपली सूर्यमाला लाईव्ह पाहू शकतो. लाईव्ह पाहण्यासोबतच तुम्ही सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह मोबाईलवर झूम करून पाहू शकता. ज्या लोकांना सूर्यमाले विषयी जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी नासाची एक वेबसाईट आहे. जाणून घेऊयात या वेबसाईटविषयी.


या वेबसाईटवर काय पाहायला मिळू शकते?


ही वेबसाईट तुम्ही जशी ओपन कराल तसे तुम्हाला संपूर्ण सूर्यमाला पाहायला मिळेल. सूर्यमालेतील सर्व काही तुम्ही या वेबसाईटवर पाहू शकाल. विशेष म्हणजे आकाशगंगा देखील तुम्ही याठिकाणी पाहू शकता. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही सूर्यमालेचा सगळा अभ्यास करू शकता. तसेच मुलांना देखील शिकवू शकता.


Solarsystem.nasa.gov या वेबसाईटवर तुम्हाला सूर्यमाला पाहण्याकरता जावे लागेल. ओपन होताच खाली एक लाईव्ह डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. तेथे तुम्ही कोणत्याही ग्रहाला झूम करून पाहू शकता. तसेच वेबसाईट ओपन केल्यानंतर तेथील सोलर सिस्टीम टॅबवर क्लिक करा, थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सोलर सिस्टीमचा लाईव्ह डॅशबोर्ड मिळेल.


NASA म्हणजे नेमके काय ?


NASA ही एक सरकारी संस्था आहे, जी अमेरिका या देशात स्थित आहे, मुळात ही एक अमेरिकन संस्था आहे.  NASA हे अमेरिकेसाठी अंतराळा संबंधित कामे पार पडते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर यांच्या नेतृत्वाखाली 1 ऑक्टोबर 1958 रोजी NASA ची स्थापना करण्यात आली. NASA च्या स्थापनेनंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर 1958 पासून पुढील काळात NASA ने अनेक यशस्वी कार्य पार पाडले, ज्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अनेक ग्रह आणि उपग्रह यांची ओळख पटली.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : तुम्हालाही थंड अन्न जेवण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा 'या' समस्यांचा वाढतो धोका