Stale Foods Side Effects : निरोगी आणि शरीराच्या शारिरीक तसेच मानसिक वाढीसाठी योग्य आणि पौष्टिक आहाराचं सेवन करणं फार गरजेचं आहे. मात्र, हे अन्न जरी पोषक असलं तरी आपण ते कोणत्या पद्धतीने आणि कसं खातो हे फार महत्त्वाचं आहे. खरंतर, गरम अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते. घरातील वडीलधारी मंडळीही फक्त ताजे अन्न खाण्याचा सल्ला देतात. मात्र, झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीत लोकांना गरम अन्न जेवण्यासाठी वेळ मिळत नाही. बहुतेक लोक घरातील थंड जेवण लवकर संपवून कामावर निघून जातात. खरंतर, हे थंड जेवण गरम करणंही योग्य नाही. बरेच लोकाना दुपारचे जेवण फ्रीजमध्ये ठेवून रात्री हेच जेवण गरम करून किंवा गरम न करता खाण्याची सवय असते. मात्र, असे करणे आरोग्यासाठी फार हानिकारक असू शकते. तुम्ही जर थंड पदार्थांचं, अन्नाचं सेवन केलं तर ते तुमच्यासाठी किती नुकसानकारक आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 
 
थंड अन्न खाल्ल्याने नुकसान होते
 
बॅक्टेरियाचा धोका वाढतो


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गरम अन्नामध्ये बॅक्टेरियाचा धोका नसतो. पण, जर तुम्ही थंड अन्नाचं सेवन केलंत तर त्या अन्नामध्ये बॅक्टेरियांची संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका असतो, जो आरोग्यासाठी फार धोकादायक आहे.
 
पचायला जास्त वेळ लागतो


जे लोक थंड अन्नाचं सेवन करतात त्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांनी ग्रासलेले दिसून येते. जे लोक गरम अन्न खातात त्यांना अशा समस्यांना फार कमी वेळा सामोरे जावे लागते. म्हणूनच आरोग्य तज्ञ फक्त गरम अन्न खाण्याचा सल्ला देतात असे दिसते.
 
चयापचय कमकुवत होते


जे लोक थंड अन्नाचं सेवन करतात त्यांची चयापचय क्रिया अनेकदा कमकुवत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अन्न नेहमी ताजे आणि गरम खावे.
 
पोटात गॅस आणि सूज येण्याच्या तक्रारी


जे लोक थंड अन्नाचं सेवन करतात त्यांच्या पोटात सूज येण्याची तक्रार असते. थंड अन्न खाल्ल्याने पचन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि ते मंदावते, त्यामुळे कार्बोहायड्रेट्स आतड्यात आंबतात.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?