Meta AI Tool : आजकाल AI ची मोठी चर्चा सर्वत्रच ऐकायला मिळते. प्रत्येक मोठी कंपनी सध्या AI चा वापर करताना दिसत आहे. AI ची लोकप्रियता देखील जगात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. AI ने भारतीय लोकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कोणतेही काम सहजतेने करण्यासाठी बरेच लोक या तंत्रज्ञानाचा वापर करतात. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्या आधीच एआयच्या शर्यतीत होत्या. आता यात भर पडली आहे ती मेटाची.
मेटा आपल्या एका नवीन AI माॅडेलवर काम करत आहे. जे OpenAI च्या सर्वात प्रगत मॉडेल GPT-4 पेक्षा अधिक चांगले असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे नवीन AI टूल आधीपासून अस्तित्वात असलेल्या Llama 2 पेक्षा अधिक शक्तिशाली आणि Open AI च्या Chat GPT पेक्षा अधिक प्रगत असेल. Llama 2 म्हणजे काय हे माहीत नसलेल्यांसाठी, Llama 2 हे जुलैमध्ये लाँच केलेले मेटा चे ओपन सोर्स AI भाषा मॉडेल आहे, जे कंपनीने Google च्या Bard आणि OpenAI च्या ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी लाँच केले होते. कंपनी पुढील वर्षापासून आपल्या नवीन टूलचे प्रशिक्षण सुरू करू शकते. अशा परिस्थितीत, कंपनी 2024 मध्ये कधीही त्याची चाचणी सुरू करू शकते.
Apple कंपनी देखील AI Tool वर करत आहे काम
Apple देखील Open AI च्या ChatGPT आणि Google च्या Bard सारख्या नवीन AI टूलवर काम करत आहे. याशिवाय, कंपनी एका चॅटबॉटवर देखील काम करत आहे ज्याला Apple GPT म्हटले जात आहे.
झोमॅटो अॅपमध्येही AI सपोर्ट मिळणार
तर काही दिवसांपूर्वी Zomato ने 'Zomato AI' सादर केले आहे. हा एक परस्परसंवादी चॅटबॉट आहे जो तुमचा फूड ऑर्डर करण्याचा अनुभव अधिक चांगला आणि सोयीचा बनविण्यासाठी तुम्हाला मदत करतो.
तुम्हाला अॅपमध्ये एक विजेट देखील मिळेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व आवडत्या पदार्थांची सेवा करणाऱ्या रेस्टॉरंटची यादी मिळते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ कमी वेळात ऑर्डर करू शकता. कोणते खाद्यपदार्थ ऑर्डर करावे हे समजत नसेल तर तुम्ही Zomato AI ची मदत घेऊ शकता. Zomato AI एक मौल्यवान साधन म्हणून ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. जे तुमचा जेवणाचा अनुभव अधिक चांगला बनवण्यात तुमची मदत करेल.
इतर महत्वाच्या बातम्या