Road Safety : 2024 सुरु होऊन तीन महिने होत आहे मात्र, अजूनही रस्ते सुरक्षेचा (Road Safety) प्रश्न हा भारतासाठी एक ऐरणीचाच प्रश्न आहे. 2023 मध्ये, राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'भारतातील रस्ते अपघात-2022' वर वार्षिक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली आहे, तर तब्बल 1,68,491 लोकांचा बळी गेला आहे. या चिंताजनक आकडेवारीमुळे वाहनचालकांना अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे लक्ष देण्यास प्रवृत्त केले आहे. या ठिकाणी अशाच काही नवीन कल्पना आहेत ज्यामुळे रस्त्यावरील अपघात टळू शकतात. तसेच, ड्रायव्हर्स आणि प्रवाश्यांसाठी प्रवास सुखाचा होऊ शकतो.
अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (ADAS) :
अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC) : यामध्ये आपल्या कारचा वेग समोरच्या वाहनाच्या किती जवळ आहे यावरून बदलतो. यामुळे ड्रायव्हरला सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो आणि समोरच्या वाहनाशी धडक होण्याची शक्यता कमी होते.
फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (FCW) : हे आणखी एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून ड्रायव्हरची कार समोरच्या कोणत्याही वाहनाच्या अगदी जवळ जात असताना त्यांना सतर्क करते.वॉर्निंग सेन्सर्स आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनांमधील टक्कर टळू शकते. यामध्ये चालकाच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेतली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघाताची शक्यता कमी होते.
लेन डिपार्चर वॉर्निंग (LDW) : यामध्ये ड्रायव्हरला अपघात होऊ नये यासाठी एक अलर्टचा इशारा देण्यात येतो. या लेन मार्किंगवर लक्ष ठेवण्यासाठी फॉरवर्ड फेसिंग असलेले एआय कॅमेरे वापरण्यात येतात.
हेड-अप डिस्प्ले (HUD) : HUD वाहनांच्या विंडस्क्रीनवर गंभीर माहिती दृष्यदृष्ट्या दाखवते. हे वाहनाच्या आतील विविध पॅनेल आणि बटणे पाहण्याची गरज दूर करते, ज्यामुळे ड्रायव्हरला पुढे रस्त्यावर लक्ष केंद्रित करता येते.
ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम (DMS) :
ड्रायव्हरच्या वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी DMS AI कॅमेरा व्हिजन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.
ड्रायव्हरला थकवा आल्यास त्यावर लक्ष ठेवणे :अनेकदा वाहन चालवताना अपुऱ्या झोपेमुळे ड्रायव्हरचा चेहरा थकल्यासारखा वाटतो.जांभई येते. डोळे बारीक होऊ लागतात. मान सतत खाली जाते यांसारख्या कारणांमुळेच अनेकदा अपघात घडतात. अशा वेळी ड्रायव्हरच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच ड्रायव्हरला अलर्ट करण्यासाठी हे वैशिष्ट्य आहे.
रिअल-टाईम डिटेक्शन : या प्रक्रियेत एआय सिस्टीम ड्रायव्हरवर कटाक्षाने लक्ष देते. जसे की, वाहन चालवताना ड्रायव्हर मोबाईलचा वापर करत असेल, सीट बेल्टचा वापर करत नसेल, किंवा विचलित होऊन वाहन चालवत असेल तर ही प्रणाली ड्रायव्हरला अलर्ट करू शकते.
इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम
इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममध्ये स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआयच्या एकत्रीकरणामुळे वाहतूक नियंत्रण आणि अपघात प्रतिबंधक क्षेत्रात बदल झाला आहे.
रिअल-टाईम मॉनिटरिंग : रिअल-टाईम ट्रॅकिंगमुळे ट्रॅफिक अपघातांना लगेच प्रतिसाद मिळू शकतो. यामुळे रस्त्यावरील अपघात बऱ्यापैकी टळू शकतात.
अॅडव्हान्स रोड सरफेस मॉनिटरिंग
अनेकदा रस्त्यावरील अपघात हे खड्ड्यांमुळे, सुरक्षेअभावी आणि रस्त्यांची बिकट परिस्थिती यामुळे होतात. त्यामुळे अॅडव्हान्स रोड सरफेस मॉनिटरिंग या प्रणालीमुळे यावर नीट लक्ष ठेवता येते आणि अपघात टाळतात येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :