AI Chatbot : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर, रेल्वेचं तिकीट बुक करणं आणि रेल्वेशी संबंधित इतर सेवांचा लाभ घेणं आता आणखी सोपं होणार आहे. याचं कारण म्हणजे भारतीय रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी एक नवीन AI चॅटबॉट AskDisha 2.0 सादर केला आहे. हा चॅटबॉट IRCTC वेबसाईटवर उपलब्ध आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून तुम्हाला तिकीट बुकिंगशी संबंधित सर्व माहिती अगदी सहज मिळू शकते. या चॅटबॉटमध्ये आणखी कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  


AskDisha 2.0 म्हणजे काय? 


AskDisha 2.0 ला to seek help anytime असंही म्हणतात. हे एक प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित चॅटबॉट आहे. हा चॅटबॉट CoRover.AI वर चालणारा आहे. तसेच, हा चॅटबॉट हिंदी आणि इंग्रजी भाषांना सपोर्ट करतो. तसेच, तो आणि IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.  


AskDisha 2.0 तुम्हाला कोणत्या कामात मदत करू शकतं? 


AskDisha 2.0 चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही रेल्वे तिकीट बुकिंगशी संबंधित अनेक कामे अगदी सहज करू शकता. तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी, PNR स्टेटस चेक करण्यासाठी, तिकिट कॅन्सल करण्यासाठी, रिफंडचा स्टेटस चेक करण्यासाठी, बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी, बुकिंग हिस्ट्री पाहण्यासाठी, ई-तिकीट पाहण्यासाठी, ERS डाऊनलोड करण्यासाठी, प्रिंट करण्यासाठी आणि ई-तिकीट शेअर करण्यासाठी यांसारख्या अशा अनेक कामासाठी मदत घेऊ शकता.  


AskDisha 2.0 कसं वापराल? 


तुम्ही आयआरसीटीसी वेबसाईट आणि मोबाईल ॲप दोन्हीवर AskDisha 2.0 वापरू शकता. यासाठी आम्ही काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. 


वेबसाईटवर


1. सर्वात आधी IRCTC वेबसाईट ओपन करा. 
2. आता होमपेजच्या खाली उजव्या बाजूला AskDisha 2.0 असा आयकॉन दिसेल. 
3. तुम्ही तुमचा प्रश्न थेट टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करून माहिती मागू शकता. 
4. तुम्ही तुमचे प्रश्न बोलून देखील विचारू शकता. 
5. बोलून प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करू शकता.
6. यानंतर चॅटबॉट तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. 


मोबाईल ॲपवर


1. तुमच्या स्मार्टफोनवर IRCTC Rail Connect ॲप डाऊनलोड करा.
2. यानंतर, ॲपमध्ये AskDisha 2.0 आयकॉन शोधा आणि तुमचा प्रश्न टाईप करा.
3. यानंतर चॅटबॉट तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.


महत्त्वाच्या बातम्या : 


CAA : आनंदवार्ता! आता भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी 'असा' करा ऑनलाईन अर्ज; सरकारने सुरु केली वेबसाईट