ChatGPT : OpenAI, ChatGPT च्या मागे असलेल्या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या भूमिकेमध्ये आणखी एक आश्चर्यकारक AI टूल लॉन्च केलं आहे. सोरा (Sora) असं या टूलचं नाव देण्यात आलं आहे. त्याआधी, प्रॉम्प्टच्या आधारे GPT चॅट करण्यासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण, आता यूजर्सना या माइंडब्लोइंग टूलद्वारे केवळ प्रॉम्प्टच्या आधारे व्हिडीओ तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. ओपनएआय सोरा ची खास गोष्ट म्हणजे यात व्हिडीओ जनरेट करण्यासाठी तुम्हाला फोटो किंवा कोणत्याही प्रकारची क्लिप वापरावी लागणार नाही. या टूलची आणखी कोणती वैशिष्ट्य आहेत ते पाहूयात. 


OpenAI Sora कसं वेगळं ठरेल? 


खरंतर, जे व्हिडीओ तयार करू शकतात आणि केवळ सूचनांच्या आधारे देऊ शकतात आतापर्यंत अशी अनेक टूल आधीच बाजारात उपलब्ध आहेत. तसेच, OpenAI सोरा या सर्वांपेक्षा वेगळा आहे. या टूलद्वारे कोणत्याही क्लिप किंवा फोटोशिवाय एचडी व्हिडीओ (HD Video) जनरेट करण्याची सुविधा मिळणार आहे. हे AI टूल एका मिनिटापर्यंत व्हिडीओ प्रॉम्प्ट तयार करू शकते आणि देऊ शकते.


सॅम ऑल्टमन यांनी दिली माहिती


ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्वत: नवीन एआय टूलची माहिती दिली आहे. त्यांनी टूलसह तयार केलेला व्हिडीओ देखील शेअर केला आणि लिहिले आहे की, "आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की सोरा काय करू शकते. तुम्हाला जे व्हिडीओ पाहायचे आहेत त्यांच्यासाठी कॅप्शनसह उत्तर द्या आणि आम्ही ते बनवण्यास सुरुवात करू." ऑल्टमनने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की प्लॅटफॉर्मवरील अनेक यूजर्सनी त्यांना सूचना पाठवल्या आणि त्यांनी शेअर केलेले परिणाम अतिशय खरे दिसतात.


यूजर्ससाठी कधी उपलब्ध होईल?


सध्या हे टूल सामान्य यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच, कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, लवकरच हे टूल यूजर्ससाठी उपलब्ध होईल असंही यूजर्सना व्हिडीओद्वारे उत्तर दिलं जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


ChatGPT : गुगलशी स्पर्धा करण्यासाठी OpenAI सर्च इंजिन येत आहे! वैशिष्ट्ये काय असतील? जाणून घ्या