Google Map : तुम्ही अँड्रॉइड (Android) फोन वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. खरंतर, आपल्यापैकी जे कोणी अॅंड्रॉईडचा मोबाईल वापरतात ते पूर्णपणे गुगलशी (Google) जोडलेले असतात. हे आपल्यापैकी काही लोकांनाच माहीत असेल. मग ते Gmail असो किंवा गुगल मॅप (Google Map). तुम्हाला हे गुगल ॲप्स तुमच्य मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये आधीच इन्स्टॉल केलेले आढळतील. पण, तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कुठेही जाल, Google तुम्हाला सहज शोधू शकेल. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे अगदी खरं आहे. खरंतर गुगल मॅपमध्ये एक फीचर आहे जे तुमचा सतत शोध घेत असतं. 


तुम्ही कुठेही गेलात तरी गुगल मॅपचे हे फिचर तुमची लोकेशन हिस्ट्री (Location History) ट्रॅक करत राहते. पण, याला थांबविण्यासाठी गुगलला थांबवण्याचा आपल्याकडे काही मार्ग आहे का आणि आपण गुगल मॅपवरून आपला लोकेशन हिस्ट्री काढून टाकू शकतो की नाही? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


Google Maps ला तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यापासून कसे थांबवाल?


सर्वात आधी Google Maps ॲप ओपन करा. Google मॅप सुरु केल्यानंतर, वरच्या उजव्या बाजूला तुमच्या प्रोफाईल फोटोवर टॅप करा. यानंतर तुम्हाला सेटिंग ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. सेटिंग्ज ऑप्शनवर टॅप केल्यानंतर आणि थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला मॅप, हिस्ट्री असे अनेक ऑप्शन्स दिसतील. 


यानंतर Maps History ऑप्शनवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला पुढील पृष्ठावर सर्वात वर History, control आणि More ऑप्शन दिसेल. गुगल तुमचा मागोवा घेणं थांबवावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला वेब आणि ॲक्टिव्हिटी ऑप्शनमधील हे फीचर बंद करावं लागेल.


'अशी' सेटिंग बंद करा 


याशिवाय, जर तुम्हाला गुगल मॅपवरून लोकेशन हिस्ट्री हटवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला डिलीट ऑप्शन दिसेल, डिलीट वर क्लिक केल्यावर तुम्हाला डिलीट टुडे, डिलीट कस्टम रेंज, डिलीट ऑल टाईम आणि ऑटो-डिलीट असे अनेक पर्याय दिसतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता आणि Google Maps डेटामधून हिस्ट्री बंद करू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Honor X9b 5G Smartphone : 16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लॉन्च