ChatGPT : आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजचे AI टेक्नॉलॉजीबाबत बरीच चर्चा होत असते. AI ने गेल्या काही महिन्यांत खूप लोकप्रियता मिळवली आहे. तसेच, हे तंत्रज्ञान (Technology) दिवसेंदिवस विकसित होत चाललं आहे.हे तंत्रज्ञान सुरू करणाऱ्या कंपन्यांपैकी एक ओपनएआय (OpenAI) आता गुगलशी स्पर्धा करण्याचा विचार करतंय. 


गुगलशी स्पर्धा करण्यासाठी नवीन सर्च इंजिन येईल का?


खरंतर, OpenAI, ज्या कंपनीने चॅटबॉट म्हणजेच ChatGPT सेवा सुरू केली, ती आता नवीन सर्च इंजिन तयार करू शकते. असे झाल्यास ओपनएआयचे सर्च इंजिन जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिनला टक्कर देऊ शकते. OpenAI ने आधीच Google सारख्या टेक दिग्गजांना नवीन जनरेशनमधील AI वैशिष्ट्ये वापरण्यास भाग पाडले आहे. पण, ज्या कंपनीने ChatGPT लाँच केले ती कंपनी सर्च इंजिनसाठी Google ला थेट टक्कर देऊ शकते अशी माहिती समोर येतेय. 


वेब प्रोडक्टवर काम करतंय OpenAI


द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, OpenAI वेब सर्च प्रॉडक्टवर काम करत आहे. सूत्रानुसार, ही सेवा अंशतः मायक्रोसॉफ्टच्या बिंगद्वारे आधारित असेल. मात्र, OpenAI ची सर्च इंजिन सेवा ChatGPT पेक्षा वेगळी असेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच, ChatGPT Plus ची मेंबरशीप असलेले यूजर्स Bing वैशिष्ट्याच्या मदतीने ब्राउझिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात.


गुगलने गेल्या अनेक दशकांपासून सर्च इंजिनच्या बाबतीत संपूर्ण जगावर राज्य केलं आहे. पण, ChatGPT सारखी सेवा सुरू करणारी कंपनी Open AI ने स्वतःचे वेब सर्च इंजिन सुरू केले तर ते Google ला नक्कीच एक मोठे यश देईल. असं सांगणयात येत आहे.


यूजर्सना ChatGPT वरून विशेष सुविधा मिळतात


खरंतर, OpenAI च्या चॅटबॉट सेवा ChatGPT द्वारे, यूजर्स Google सारख्या अनेक सेवांचा लाभ घेत आहेत. त्याच वेळी, ChatGPT Plus योजना वापरणाऱ्या यूजर्सना AI वैशिष्ट्यांसह शोध सुविधेचा अनुभव आधीच मिळत आहे. पण, OpenAI ने Google किंवा Chrome सारखे कोणतेही सर्च इंजिन सुरू केले, जे जगभरातील सामान्य यूजर्ससाठी काम करेल, तर नुकसान होण्याची शक्यता आहे. Google च्या सेवेत लक्षणीय वाढ होऊ शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


गुगलकडून नवीन AI मॉडेल जेमिनी 1.5 लॉन्च, आता अनेक अवघड कामे सहज होणार; भारतातही सेवा सुरू