Phone Storage : जेव्हापासून तुम्ही इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) किंवा इतर सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर अपडेट राहण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून तुम्हालाही कधी ना कधी मोबाईल स्टोरेज (Mobile Storage) प्रोब्लमचा सामना करावा लागला असेल. जर ही समस्या अद्याप आली नाहीये तर वेळीच सावध व्हा. अशा वेळी काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील स्टोरेज कमी करू शकता. 


अनेकदा असं होतं की, रोज फोटो-व्हिडीओ बनवल्यानंतर तुमच्या फोनमध्ये Mobile Storage Full असा मेसेज येतो. याशिवाय फोन हँग होण्याची समस्याही सुरू होते. अशा परिस्थितीत, आपण अनेकदा फोनमधील मोठ्या फाईल्स तसेच काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हटविण्याचा, काही अॅप्स डिलीट करण्याच विचार करतो. पण, आपल्यापैकी अनेकांना फोनमधील स्टोरेज तयार करण्याचा योग्य मार्ग माहित नाही. म्हणून, येथे आम्ही तुम्हाला फोनमधील स्टोरेज मॅनेज करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत. 


Free Up Space सेक्शनमध्ये जा 


जर तुमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल असेल तर त्यात बाय डिफॉल्ट Free Up Space फीचर दिलेले आहे. जेव्हाही तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज भरलेले असते, तेव्हा सर्वात आधी Free Up Space वर जा आणि स्टोरेज तयार करायला सुरुवात करा. यानंतर, तुमच्या मोबाईलमधून न वापरलेले ॲप्स हटवा. म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये अनावश्यकपणे स्पेस घेणारे ॲप्स डिलीट करा. अनेक वेळा फोनमध्ये काही ॲप्स बाय डिफॉल्ट येतात, त्यातील अनावश्यक ॲप्स काढून टाका.


स्टोरेज क्लीन करा 


स्मार्टफोनच्या स्टोरेज ऑप्शनवर जा आणि वेगवेगळ्या रेंजमध्ये आढळलेल्या सर्व नको असलेल्या फाईल्स, गाणी, व्हिडीओ डिलीट करा. या प्रक्रियेमुळे तुमच्या फोनमध्ये भरपूर स्पेस तयार होईल. कधीकधी व्हिडीओ आणि फोटो जास्त जागा घेतात. तसेच, तुम्हाला वाटल्यास  तुमच्या मोबाईलवरून Instagram वर अपलोड केलेले व्हिडीओ डिलीट करू शकता. खरंतर, इन्स्टाग्रामवर तुम्ही तुमचा कंटेंट जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत तो तसाच राहतो. अशा वेळी तुमचे फोटो आणि व्हिडीओ कायमचे सेव्ह राहतात. तसेच, याशिवाय इन्स्टाग्रामच्या सेटिंग्जमध्ये स्टोरी ऑटो डाऊनलोड बंद करा. याचबरोबर, तुम्ही जे काही इन्स्टाग्रामवर अपलोड करता ते देखील पुन्हा पुन्हा सेव्ह केले जाते. यामुळे सुद्धा मोबाईलमध्ये खूप स्पेस घेतली जाते. 


ईमेल्स वारंवार क्लीन करा 


तुमचा ईमेल सेक्शन वेळोवेळी क्लीन करा. नको असलेले मेल्स डिलीट करा. तसेच, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲप्स वापरण्याऐवजी वेबसाईट वापरायला सुरुवात करा.  


महत्त्वाच्या बातम्या :


Tecno ने लॉन्च केला Robot Dog; कॅमेरा आणि दुर्बिणीसह पेट डॉगप्रमाणे तुमची सगळी कामं करणार; कसा दिसतो पाहाच