मुंबई : मुंबई हे भारतातील टॉप टेक पदांसाठी सर्वाधिक वेतन देणारे 5 व्या क्रमांकाचे वे शहर ठरले असून बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. गुरगाव, दिल्‍ली आणि हैदराबाद हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. टीमलीज डिजिटलचा नवीन अहवाल 'डिजिटल स्किल्‍स अँड सॅलरी प्राइमर फॉर एफवाय 2025' मधून ही बाब निदर्शनास आली आहे. राष्‍ट्रीय स्‍तरावर, मुंबई शहर भारतातील आपल्‍या ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) विस्‍तारित करणाऱ्या आणि आयटी, आर्थिक, संशोधन व विकासमधील आपल्‍या क्षमता विस्‍तारित करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकांना चालना देणाऱ्या बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांसाठी धोरणात्‍मक हब बनले आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि संपन्‍न टॅलेंट समूहासह मुंबई या विस्‍तारीकरणांसाठी प्रमुख भौगोलिक क्षेत्र बनले आहे.


मुंबईतील सर्वात लोकप्रिय टेक रोजगारांपैकी प्रॉडक्‍ट मॅनेजमेंट, डेटा सायन्‍स आणि डेटा इंजीनिअरिंग अग्रस्‍थानी आहे, जे अनुक्रमे जवळपास प्रतिवर्ष 19.5 लाख रूपये, प्रतिवर्ष 14.5 लाख रूपये व प्रतिवर्ष 10 लाख रूपये इतके प्रभावी वेतन पॅकेजेस देतात. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे या तीन प्रमुख रोजगारांमध्‍ये आर्थिक वर्ष 24 ते आर्थिक वर्ष 25 पर्यंत सर्व पातळ्यांवर स्थिर वार्षिक वाढ दिसून येत आहे, विशेषत: वरिष्‍ठ पदांसाठी 7 टक्‍के ते 11 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. तसेच, क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग, डेटा अॅनालिटिक्‍स, सॉफ्टवेअर डेव्‍हलपमेंट, फुल स्‍टॅक डेव्‍हलपमेंट आणि डेव्‍हऑप्‍समधील रोजगारांसाठी प्रतिवर्ष 7.2 लाख रूपये ते प्रतिवर्ष 8.3 लाख रूपये इतके स्‍पर्धात्‍मक वेतन आहे. पण, फायनान्शियल अॅनालिसिस आणि सायबर सिक्‍युरिटीसाठी अनुक्रमे जवळपास प्रतिवर्ष 6.6 लाख रूपये व प्रतिवर्ष 5.4 लाख रूपये वेतन आहे.


टेक स्‍टाफिंग व लर्निंग सोल्‍यूशन्‍समधील बाजारपेठ अग्रणी टीमलीज डिजिटलचा हा अहवाल आयटी उत्‍पादने व सेवा, ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) आणि नॉन-टेक उद्योग अशा विविध क्षेत्रांमधील आधुनिक उद्योग ट्रेण्‍ड्स, महत्त्वपूर्ण कौशल्‍ये व सॅलरी बेंचमार्क्‍सबाबत आवश्‍यक माहिती देतो. हा सर्वसमावेशक अहवाल आर्थिक वर्ष 2024 व आर्थिक वर्ष 2025 दरम्‍यान कौशल्‍य मागणीचे सर्वांगीण विश्‍लेषण देतो, तसेच रोजगार कार्य, शहर, अनुभव पातळी व विशिष्‍ट पदांनुसार वेतनांना जारी करतो. तसेच, हा अहवाल उच्‍च मागणी असलेली कौशल्‍ये व संबंधित प्रमाणनांचे मूल्‍यांकन करतो आणि कौशल्‍यांमधील तफावतींना दूर करण्‍यासाठी व बाजारपेठेतील गरजांशी संलग्‍न होण्‍यासाठी धोरणात्‍मक शिफारशी देतो.


टेक बाजारपेठेचे पुनरावलोकन देत टीमलीज डिजिटलच्‍या अहवालामधून निदर्शनास येते की, आर्थिक वर्ष 24 पर्यंत भारतातील टेक बाजारपेठ आकार 254 बिलियन अमेरिकन डॉलर्स होता, ज्‍यामध्‍ये वार्षिक 3.8 टक्‍क्‍यांची वाढ झाली आणि जवळपास 5.6 दशलक्ष टेक कर्मचारी होते. 2020 ते 2024 पर्यंत भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय), मशिन लर्निंग (एमएल), ब्‍लॉकचेन टेक, आयओटी, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए), एज कम्‍प्‍युटिंग आणि क्‍वॉन्‍टम कम्‍प्‍युटिंग यासह आवश्‍यक टूल्‍स जसे पायथॉन, आर, टेन्‍सरफ्लो व पायटॉर्च यामध्‍ये मोठी प्रगती दिसण्‍यात आली. पण, कौशल्‍यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून आला, जेथे भारतातील फक्‍त 2.5 टक्‍के इंजीनिअर्सकडे एआय कौशल्‍ये आहेत आणि फक्‍त 5.5 टक्‍के इंजीनिअर्स मुलभूत प्रोग्रामिंग क्षमतांसह पात्र ठरले आहेत. या वाढत्‍या टेक कौशल्‍यांमधील तफावत दूर करण्‍यासाठी भारतातील 86 टक्के व्‍यवसाय सक्रियपणे त्‍यांच्‍या आयटी कर्मचाऱ्यांचे रिस्किलिंग करत आहेत. 


या अहवालाच्‍या निष्‍पत्तींबाबत मत व्‍यक्‍त करत टीमलीज डिजिटलच्‍या स्‍ट्रॅटेजी अँड ग्रोथच्‍या उपाध्‍यक्ष मुनिरा लोलीवाला म्हणाल्‍या, ''मुंबई शहर भारतातील आयटी क्षेत्राच्‍या विकासासाठी, विशेषत: ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचा (जीसीसी) विस्‍तार करण्‍यासाठी प्रमुख योगदानकर्ता आहे. अनेक मल्‍टीनॅशनल कंपन्‍या त्‍यांच्‍या आयटी, आर्थिक व आरअँडी क्षमता वाढवण्‍यासाठी मुंबईतील जीसीसींमध्‍ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भारतातील एकूण जीसीसींपैकी शहरामध्‍ये 12 टक्‍के ते 16 टक्‍के जीसीसी आहेत. यामुळे रोजगार निर्मितीला गती मिळण्‍यासोबत एआय, नॅच्‍युरल लँग्‍वेज प्रोसेसिंग आणि डेटा मायनिंगप्रती मागणी वाढत आहे. मुंबईमध्‍ये प्रॉडक्‍ट मॅनेजमेंट, डेटा सायन्‍स आणि डेटा इंजीनिअरिंगसह टॉप टेक पदांसाठी स्‍पर्धात्‍मक वेतन देखील दिले जाते. 5 जी व आयओटी यासारखे उदयोन्‍मुख तंत्रज्ञान भारतातील टेक लँडस्‍केपला नव्‍या उंचीवर घेऊन जात असताना मुंबई नाविन्‍यता व विकासामध्‍ये नेतृत्‍व करण्‍यास सज्‍ज आहे. गुंतवणूका व ब्‍लॉकचेन, तसेच रिमोट वर्क व डिजिटल-केंद्रित धोरणांमधील वाढीसह मुंबई या डिजिटल परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी असण्‍यास आणि प्रमुख टेक हब म्‍हणून आपले स्‍थान कायम राखण्‍यास उत्तमरित्‍या स्थित आहे.''


ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC):


एआय, एमएल आणि ब्‍लॉकचेनमधील मोठ्या प्रमाणात गुंतवणूका होण्‍यासह भारतातील टेक क्षेत्राचा महसूल 2025 पर्यंत 350 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. कार्यक्षमता व नाविन्‍यतेला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत भारतात सध्‍या 1600 हून अधिक जीसीसी आहेत, ज्‍यामध्‍ये 1.66 दशलक्षहून अधिक व्‍यावसायिक कार्यरत आहेत. या अहवालानुसार, भारतात पुढील 5 ते 6 वर्षांमध्‍ये 800 नवीन जीसीसीची स्थापना होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामधून जागतिक टेक हब म्‍हणून देशाचे वाढते प्रभुत्‍व दिसून येते. रोचक बाब म्‍हणजे कोलकाता, अहमदाबाद व वडोदारा यांसारख्‍या द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये जीसीसींची स्‍थापना करण्‍याच्‍या वाढत्‍या ट्रेण्‍डमधून देशातील भौगोलिक विविधतेनुसार टेक संधी दिसून येतात. मागणी वाढत असलेली कौशल्‍ये आहेत पायटॉर्च, एडब्‍ल्‍यूएस, डेव्‍हऑप्‍स, एनएलपी, कुबेर्नेट्स, हायपरलेजर फॅब्रिक, ब्‍लॉकचेन, टॅब्‍लो, एसक्‍यूएल आणि सर्विसनाऊ.


आयटी उत्‍पादने व सेवा आणि नॉन-टेक उद्योग:


आयटी उत्‍पादने व सेवांमध्‍ये क्‍लाऊड गुंतवणूक पुढील 5 वर्षांत 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढण्‍यास सज्‍ज आहे. आयटी उत्‍पादने व सेवा २०२६ पर्यंत भारताच्‍या जीडीपीमध्‍ये ८ टक्‍क्‍यांचे योगदान देण्‍याची आणि क्‍लाऊड सोल्‍यूशन्‍सचा अवलंब करत 14 दशलक्ष रोजगार निर्माण करण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामधून क्षेत्राची आर्थिक प्रभावाप्रती क्षमता दिसून येते. प्रिझ्माक्‍लाऊड, सेल्‍सफोर्स, आयटीएसएम, पॉवरबीआय व ओरॅकल या कौशल्‍यांसाठी मागणीत वाढ होत असताना या अहवालामधून स्‍केच, यूआय पाथ, स्‍प्‍लंक आणि ऑटोमेशन एनीव्‍हेअर यासाठी मागणीत घट होताना निदर्शनास येते. 


पारंपारिकरित्‍या नॉन-टेक उद्योगांमध्‍ये देखील प्रग‍त तंत्रज्ञानांच्‍या वापराच्‍या माध्‍यमातून परिवर्तन होत आहे, जेथे टेलिकॉम, मीडिया अँड एन्‍टरटेन्‍मेंट, बीएफएसआय आणि एनर्जी व युटिलिटीज क्षेत्रांमधील ७० टक्‍क्‍यांहून अधिक कंपन्‍या त्‍यांचे 20 टक्‍क्‍यांहून अधिक तंत्रज्ञान बजेट डिजिटल प्रगतीसाठी वापरत आहेत. या नॉन-टेक क्षेत्रातील टेक टॅलेंट समूह देखील 7.86 टक्‍के सीएजीआरने विस्‍तारित होत आर्थिक वर्ष 22 मधील 7.65 लाखांवरून आर्थिक वर्ष 27 मध्‍ये 11.15 लाखांपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामधून विविध पारंपारिक उद्योगांमध्‍ये तंत्रज्ञानाचा वाढता समावेश दिसून येतो. याव्‍यतिरिक्‍त, क्षेत्राची व्‍याप्‍ती पाहता ट्रेण्डिंग कौशल्‍यांची श्रेणी व्‍यापक आहे. पण, घट दिसून येणारी कौशल्‍ये आहेत जिम्‍प, झेनडेस्‍क, नॅगिओस, गुगल क्‍लाऊड एसडीके आणि ओपनस्‍टॅक सीएलआय.


ही बातमी वाचा: