Smartphone : अनेकांना प्रीमियम स्मार्टफोन (Smartphone) घेण्याची आवड असते. पण, या फोनचे बजेट फार जास्त असल्या कारणाने अनेकांना इच्छा असूनही ते घेता येत नाहीत. प्रीमियम स्मार्टफोन आवडण्यामागचं कारण म्हणजे ते फोटो आणि व्हिडीओग्राफीसाठी फार चांगले असतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत ज्यात उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स असतील. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला या ऑनलाइन वर मोठ्या प्रमाणात सूट मिळू शकेल.
OnePlus 11R स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6GB रॅम, 256GB स्टोरेज मिळतोय. स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आणि 4cm मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ऑप्टिकल झूम सपोर्ट मिळत नाही पण हा स्मार्टफोन 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी तुम्हाला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनची मूळ किंमत 44,999 रुपये आहे. पण, तुम्ही Amazon वरून फक्त 41,999 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
Motorola razr 40 बेस्ट कॅमेरा फीचर
या स्मार्टफोनचा लूक तुम्हाला खूप आवडेल. हा फोल्ड करण्यायोग्य फोन आहे, जो फोल्ड होऊन कॉम्पॅक्ट फोन बनू शकतो. या फोनची मूळ किंमत 99,999 रुपये आहे. पण, तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून 55 टक्के सूट देऊन फक्त 44,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सेल आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
Samsung Galaxy S21 FE स्वस्त होईल
या Samsung Galaxy फोनमध्ये तुम्हाला एक जबरदस्त कॅमेरा मिळेल. फोनच्या मागील बाजूस तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. यात 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा, 12 मेगापिक्सेल वाईड अँगल आणि 8 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आहे. समोर 32 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 49,990 रुपये आहे. पण, तुम्ही 32 टक्के सूट देऊन केवळ 33,890 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
वर नमूद केलेल्या तीन स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अधिक पर्याय मिळत आहेत. आपण इच्छित असल्यास, आपण इतर पर्यायांकडे देखील वळू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :