Samsung Washing Machine : सॅमसंग (Samsung) कंपनीकडून आज एआय इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सची नवीन रेंज लाँच केली आहे. वॉशिंग मशिन्‍सची ही नवीन रेंज एआय वॉश, क्‍यू-ड्राईव्‍हTM आणि ऑटो डिस्‍पेन्‍स अशी अॅडव्हान्स वैशिष्‍ट्ये असलेली 11 किग्रॅ विभागातील पहिली रेंज आहे. ज्‍यामुळे 50 टक्‍के फास्ट गतीने कपडे धुतले जातात. तसेच, 45.5 टक्‍के सर्वोत्तम फॅब्रिक केअर मिळते आणि जवळपास 70 टक्‍के अधिक ऊर्जा मिळते. 


एआय इकोबबलTM सॅमसंगच्‍या क्‍यू-बबलTM आणि क्विकड्राइव्‍ह TM टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. क्‍यू-बबल™ टेक्नॉलॉजीमध्ये जलदपणे डिटर्जंट सामावून जाण्‍यासाठी अधिक प्रमाणात बबल्‍स निर्माण करण्‍याकरिता अतिरिक्‍त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन समाविष्‍ट आहे. क्विकड्राइव्‍हTM वॉश टाईम जवळपास 50 टक्‍क्‍यांनी कमी करते. ही वैशिष्‍ट्ये एआय इकोबबलची कार्यक्षमता सुधारित करतात. तसेच पाणी आणि वीजेची मोठ्या प्रमाणात बचत करतात. ऑटो डिस्‍पेन्‍स आणि एआय वॉश असलेली नवीन रेंज सर्वोत्तम आणि स्‍मार्ट आहे. एआय वॉश वैशिष्‍ट्य कपड्यांचा भार ओळखते आणि त्‍यानुसार आवश्‍यक पाणी आणि डिटर्जंटचा वापर करते. 


या संदर्भात सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेस व्‍यवसायाचे वरिष्‍ठ संचालक पुष्‍प बाईशाकिया म्हणतात की, ''सॅमसंगमध्‍ये शाश्‍वत तंत्रज्ञान सादर करण्‍यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. 11 किग्रॅ फुली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिन्‍स विभागातील आमची पहिली रेंज अत्‍यंत ऊर्जा कार्यक्षम आहे. ऑटो डिस्‍पेन्‍स, एआय वॉश आणि क्‍यू-ड्राईव्‍हTM यांसारखी वैशिष्‍ट्ये वॉशिंगला अधिक सोपे आणि सुलभ करतात,''.


डिझाईन आणि कलर 


इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिन रेंजमध्ये मॉडर्न डिझाईनसह रिअर कंट्रोल पॅनेल असेल आणि काळ्या कलरमध्ये उपलब्‍ध असेल. 


किंमत आणि उपलब्‍धता


नवीन रेंज 7 मार्च 2024 पासून 67,990 रूपये ते 71,990 रूपयांपर्यंतच्‍या किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. निवडक मॉडेल्‍स सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप, रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ईकॉमर्स व्‍यासपीठांवर उपलब्‍ध असतील. 


वॉरंटी आणि ऑफर्स 


डिजिटल इन्‍वर्टर टेक्‍नॉलॉजीसह सुसज्‍ज नवीन मॉडेल्‍स 20 वर्षांच्‍या वॉरंटीसह येतात. जवळपास 70 टक्‍के वीजबचतीसाठी एआय इकोबबल™ 
नवीन मॉडेलमध्‍ये अत्‍यंत कार्यक्षम आणि इको-फ्रेण्‍डली टेक्नॉलॉजी एआय इकोबबल™ आहे, जे डिटर्जंटला बबल्‍समध्‍ये बदलते. यामुळे कमी तापमानामध्‍ये देखील कपड्यांवरील धूळ जलदपणे निघून जाते आणि जवळपास 70 टक्‍के वीजेची बचत होते, तसेच मातीचे डाग 24 टक्‍क्‍यांनी कमी होतात आणि 45.5 टक्‍के सर्वोत्तम फॅब्रिक केअरची खात्री मिळते. एआय इकोबबल™ विविध कपडे आणि त्‍यांच्‍या गुणधर्मांना ओळखते आणि अनेक डेटा पॅटर्न्‍समधून योग्‍य वॉश सायकल ऑप्टिमाईज करते. यामुळे फॅब्रिक सेन्सिंगसह कपड्यांचे जवळपास 20 टक्‍के संरक्षण होण्‍यास मदत होते.  


अधिक स्‍पेससाठी स्‍पेसमॅक्‍स™ डिझाईन 


600 x850 x 600 मिमी आकार असलेली नवीन 11-किग्रॅ वॉशिंग मशिन कोणत्‍याही जागेमध्‍ये सहजपणे मावू शकते, ज्‍यामुळे लिव्हिंग स्‍पेसेस ऑप्टिमाइज करू पाहणाऱ्या आजच्‍या ग्राहकांसाठी ही वॉशिंग मशिन योग्‍य पर्याय आहे. यामधील स्‍पेसमॅक्‍स™ डिझाईन आतील बाजूस अधिक स्‍पेस निर्माण करते, ज्‍यामुळे मोठ्या आकाराच्‍या लाँड्री वस्‍तूंचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होते. 


महत्त्वाच्या बातम्या :


वेटींग की रिग्रेट... रेल्वे तिकिटांची कटकट मिटणार; AI टूल तिकीट बुक करुन देणार; काय असेल प्रोसेस?