Motorola Bendable Phone : आजवर आपण अनेक फोल्डेबल आणि फ्लिप होणारे स्मार्टफोन (Smartphone) पाहिले आहेत. पण, याच्याही पलिकडे जाऊन तुम्ही बेंड करणारा फोन याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.  सध्या स्पेन शहरातील बार्सिलानोमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) हा टेक विश्वातील सर्वात मोठा इव्हेंट सुरु आहे. या ठिकाणी अनेक दिग्गज टेक कंपन्या आपापलं प्रोडक्ट सादर करतायत. यामध्येच मोटोरोलाचा हा बेंड करणारा स्मार्टफोन सादर करण्यात आला. हा फोन सध्या बाजारात असलेल्या सर्व फोनपेक्षा वेगळा आहे आणि त्याची डिझाईन तर अगदी स्मार्टवॉचसारखी आहे. आता हा स्मार्टफोन बेंड झाल्यावर नेमका कसा काम करेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


टेक इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेला हा स्मार्टफोन तुम्ही तुमच्या मनगटावर घड्याळाप्रमाणे घालू शकता. मोबाईल कंपनी मोटोरोलाने आपला आत्तापर्यंतचा सर्वात वेगळा फोन सादर केला आहे. या फोनच्या नावाबद्दल बोलायचे झाले तर या फोनचे नाव शेप शिफ्टिंग स्मार्टफोन असं आहे.


मोटोरोलाच्या शेप शिफ्टिंग फोनमध्ये हे फीचर्स उपलब्ध 


मोटोरोलाच्या या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला 6.9 इंचाचा डायगोनल डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये जाड बेझल्स असून फोनच्या मागील बाजूस फॅब्रिक मटेरियल वापरण्यात आले आहे. या फॅब्रिक मटेरियलमुळे फोनची पकड चांगली असेल. हा फोन घड्याळ म्हणूनदेखील तुम्ही परिधान करू शकता.  


रोल करण्यायोग्य फोनमध्ये 'हे' विशेष वैशिष्ट्य 


या फोनमध्ये तुम्हाला एक खास फीचर मिळत आहे ज्यामध्ये ॲडॅप्टिव्ह यूजर इंटरफेसचा समावेश आहे. त्याच्या मदतीने मोबाईल टेबलावर वाकवून ठेवला की स्क्रीन आपोआप वर जाते. यानंतर, इंस्टॉल केलेले ॲप्स फोनवर दिसायला लागतात. फोनची स्क्रीन 4.6 इंच आहे. या रोल करण्यायोग्य फोनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे वॉलपेपर सानुकूलित आणि लागू करू शकता.


किंमत आणि उपलब्धता


सध्या, ही केवळ एक संकल्पना आहे जी MWC 2024 कार्यक्रमात सादर केली गेली आहे. भविष्यात हा फोन यूजर्सची पसंती ठरण्याची शक्यता आहे. हा शो यावर्षी 26 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या इव्हेंटमध्ये टॉप स्मार्टफोन ब्रँड, लॅपटॉप आणि फ्युचरिस्टिक सारखे प्रोडक्ट्स  सादर केले जातायत. 


महत्त्वाच्या बातम्या :


Whatsapp New Feature : आता कोणत्याही तारखेचा मेसेज एका क्षणात पाहू शकता; Whatsapp चं भन्नाट फीचर