OnePlus 12R Smartphone Launched : OnePlus स्मार्टफोन (Oneplus Smartphone) वापरणाऱ्यांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकतंच लोकप्रिय कंपनी OnePlus ने भारतात आपला नवीनतम स्मार्टफोन OnePlus 12R चे स्पेशल एडिशन Genshin Impact Edition लॉन्च केला आहे. miHoYo च्या ॲक्शन रोल-प्लेइंग गेम, Genshin Impact वरून या स्मार्टफोनची प्रेरणा घेऊन त्याची खास डिझाईन तयार करण्यात आली आहे.  


हा हँडसेट गेमिंग-सेंट्रिक कस्टमायझेशनसह येतो आणि त्यात कस्टमायझेशनसाठी केक-थीम केस सारख्या ॲक्सेसरीजसह गिफ्ट बॉक्सचा समावेश आहे. OnePlus 12R Genshin Impact Edition मध्ये इलेक्ट्रिक-थीम असलेली फिनिश आणि मागील बाजूस Keking लोगो आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सुद्धा देण्यात आला आहे. तसेच, आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळू शकतात. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


भारतात किंमत किती आहे?


OnePlus 12R Genshin Impact Edition ची 16GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे. हे इलेक्ट्रो व्हायलेट कलर ऑप्शनमध्ये येते आणि तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर ते खरेदी करू शकता. तर त्याच्या 8GB RAM + 128GB मॉडेलची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे.


स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय आहेत? 





डिस्प्ले - OnePlus 12R Genshin Impact Edition Android मध्ये, तुम्हाला 6.78-इंच 1.5K मिळेल, ज्याचे 1,264x2,780 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.


प्रोसेसर - या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल, ज्यामध्ये 16GB LPDDR5x रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज आहे.


कॅमेरा - OnePlus 12R Genshin Impact Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय या फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे.


OnePlus 12R Genshin Impact Edition च्या कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, GPS आणि NFC यांचा समावेश आहे. हे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जायरोस्कोप, एक्सीलरोमीटर, मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येते.


स्मार्टफोनचा बॅटरी परफॉर्मन्स किती आहे? 


OnePlus 12R च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 100W SuperVOOC वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Whatsapp New Feature : आता कोणत्याही तारखेचा मेसेज एका क्षणात पाहू शकता; Whatsapp चं भन्नाट फीचर