Realme Narzo N55 : Realme स्मार्टफोन वापरणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला Realme ने आपला पुढील जनरेशनचा Narzo स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Realme Narzo N55 आज भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात आज (12 एप्रिल 2023) दुपारी 12 वाजता (IST) एका ऑनलाईन लॉन्च इव्हेंटद्वारे लॉन्च करण्यात आला आहे. याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर देखील करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन साईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि रिटेल स्टोअर्सवरूनही खरेदी करता येईल. 


Realme Narzo N55 ची वैशिष्ट्ये


डिस्प्ले : 90Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच FHD+ IPS LCD पॅनेल


प्रोसेसर : ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर 


RAM आणि स्टोरेज : 8GB RAM आणि 128GB पर्यंत ऑनबोर्ड मेमरी


ऑपरेटिंग सिस्टम : Android 13-आधारित Realme UI 4.0 स्किन 


Realme Narzo N55 ची बॅटरी आणि चार्जिंग


Realme Narzo N55 स्मार्टफोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. यासोबतच हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह येतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा स्मार्टफोन 29 मिनिटांत 50% चार्ज होऊ शकतो आणि 63 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये दोन बॅक कॅमेरे आहेत, त्यापैकी प्रायमरी कॅमेरा 64MP आहे. त्यासोबत 2MP डेप्थ लेन्स असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी स्मार्टफोनमध्ये 8MP कॅमेरा असेल.


Realme Narzo N55 किंमत किती?


Realme Narzo N55 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे, तर त्याच्या टॉप-टायर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. हा डिव्हाईस प्राईम ब्लॅक आणि प्राईम ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तुम्ही स्मार्टफोन Realme च्या अधिकृत वेबसाईट आणि Amazon India वरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची पहिली विक्री 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.


हँडसेटमध्ये ड्युअल 4G, ड्युअल-बँड WIFI, ब्लूटूथ, जीपीएस (GPS), यूएसबी टाईप-सी पोर्ट, साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, अँड्रॉइड 13-आधारित Realme UI स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स असू शकते. 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


OnePlus Nord CE 3 Lite Updates: खिशाला परवडणारा बजेट फोन; One Plus Nord CE3 चा आज सेल, जाणून घ्या खास फिचर्स