Poco X6 5G : चीनचा स्मार्टफोन ब्रँड पोको लवकरच( Poco ) भारतात दोन नवे (Poco Smartphone) स्मार्टफोन लाँच करू शकतो. कंपनीचे भारतीय प्रमुख हिमांशू टंडन यांनी एक्स पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. एक्स पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, कंपनीकडून नवीन गिफ्ट लवकरच लाँच केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, पोको जानेवारीमध्ये Poco X6 5G सीरिज लाँच करू शकते, ज्यात Poco X6 5G आणि Poco X6 5G Pro चा समावेश आहे.
स्पेसिफिकेशन नेमके कोणते असतील?
Poco X6 5G सीरिज अंतर्गत कंपनी Poco X6 5G आ णि Poco X6 5G Pro असे दोन फोन लाँच करणार आहे. या फोनच्या बेस मॉडेलची किंमत प्रो मॉडेलपेक्षा कमी असेल. गिझमोचायनाच्या रिपोर्टनुसार, पोको एक्स 6 रेडमी नोट 13 प्रोचे रिब्रँडेड व्हर्जन असू शकते. त्याचप्रमाणे, प्रो मॉडेल रेडमी के 70 ई चे रिब्रँडेड व्हर्जन असू शकते.
रिपोर्टनुसार, Poco X6 5G मध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा एमोलेड डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 प्रोसेसर, एलपीडीडीआर 5 रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज मिळू शकतो. कंपनी स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते, ज्यात 64 एमपी चा मुख्य कॅमेरा, 13 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 एमपीचा तिसरा कॅमेरा असू शकतो.
फिचर्स कोणते मिळणार?
रिपोर्टनुसार, Poco X6 Pro 5G स्मार्टफोन एनबीटीसी, बीआयएस आणि एफसीसी सारख्या सर्टिफिकेशन वेबसाईट्सवर दिसला आहे. कंपनी हा स्मार्टफोन जानेवारीमध्ये लाँच करू शकते. भारताव्यतिरिक्त इतर जागतिक बाजारपेठांमध्येही हे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. प्रो मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8300 अल्ट्रा प्रोसेसर आणि 8/256 जीबी आणि 12/512 जीबी स्टोरेज पर्याय मिळण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल, असे म्हटले जात आहे.
किंमत किती असेल?
चीनमध्ये लाँच करण्यात आलेला रेडमी के70ई हा स्मार्टफोन कंपनीने जवळपास 23,000 रुपयांमध्ये लाँच केला आहे. भारतात प्रो मॉडेल या रेंजच्या आसपास लाँच केले जाऊ शकते. जानेवारीमध्ये पोकोव्यतिरिक्त वनप्लस 12 सीरिज, गॅलेक्सी एस 24 सीरिज आणि रेडमी नोट 13 प्रो 5जी सीरिज लाँच होणार आहेत. वनप्लस 12 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप 64 एमपी टेलिफोटो लेन्ससह मिळू शकतो. यात कंपनी क्वालकॉमची लेटेस्ट चिपही देणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Redmi Note 13 Pro 5G : Redmi Note 13 Pro 5G सीरिज 'या' दिवशी लाँच होणार; फिचर्स आले समोर