Redmi Note 13 Pro 5G : Redmi च्या आगामी सीरिजबाबत (Redmi) लीक समोर आले आहेत. ही सीरिज  लवकरच जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे. तर ही सीरिज पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच केली जाणार आहे. पण लाँचिंगपूर्वी त्याच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचा तपशील समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया या सीरिजमध्ये कोणते फिचर्स पाहायला मिळणार आहेत.


कधी लाँच होणार?


Redmi Note 13 Pro 5G सीरिज 4 जानेवारीला भारतीय बाजारात लाँच होणार आहे. या सीरिजअंतर्गत लाँच करण्यात आलेले फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील. कंपनीने हे फोन चीनमध्ये लाँच केले आहेत.


चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Redmi Note 13 Pro 5G (12GB+256GB स्टोरेज) 1799 युआन म्हणजेच 21,500 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. अशा तऱ्हेने हा फोन भारतात 25,000 रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकता.


रेडमी नोट 13 5जी स्पेसिफिकेशन्स


रिपोर्ट्सनुसार,  Redmi Note 13 Pro 5G  मध्ये 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 256 जीबी यूएफएस 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे. जे एसएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येते.


फोनमध्ये 2400 बाय 1080 पिक्सल रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला 6.67  इंचाचा अमोलेड डिस्प्ले असेल. याचा टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्झ असेल.


हा आगामी स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 6080 एसओसी प्रोसेसरसोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. यात एमआययूआय 13 वर आधारित अँड्रॉइड 14ऑपरेटिंग सिस्टिम असेल.


फोनमध्ये 53 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 एमएएच ची बॅटरी असेल. यात बॅक पॅनेलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स मिळेल. सेल्फी प्रेमींसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर असणार आहे.


या फोनला पाणी आणि धुळीला प्रतिरोधक म्हणून आयपी 54 चे रेटिंग देखील देण्यात आले असून कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.2, ड्युअल सिम सपोर्ट, एआय फेस लॉक आणि एनएफसी मिळेल.


 Redmi Note 13 Pro 5G चे फिचर्स


सीरिजच्या प्रो मॉडेलच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.


परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 एसओसी प्रोसेसर असेल. फोनमध्ये अॅड्रेनो 710 ग्राफिक्स कार्ड देण्यात येणार आहे.


यात 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स असेल.
सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा लेन्स असेल.


यात 57 वॉट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5100 एमएएचची बॅटरी असेल.


इतर महत्वाची बातमी-


Apple Gadgets : Apple Device वर भन्नाट ख्रिसमस ऑफर्स; स्वस्तात मिळतोय Apple MacBook Air, MacBook Pro, iphone 15!